Sunday, February 6, 2011

पाऊले...

रोजचाच थेंब..
दिसे आज तो नभांत.
दिसेनाशी पाऊले...
भर पावसांत.

अंगणी का साचला...
माझ्या प्राजक्ताचा सडा..
वर चंद्रमा का लपे
उगा चांदण्यात
दिसेनाशी पाऊले
भर पावसांत.

थेंब थेंबातुन साचे...
प्रेम माझ्या त्या तळ्यात...
पायवाट भिजवी...सये
पाऊले ती तुझी दवांत
दिसेनाशी पाऊले
भर पावसांत.

नाद पैजणांचा उठवी
काहुर का मनांत..
आहेस स्वप्नी...मग
कधी येशील सत्यात...
दिसुदेत सये...तुझी पाऊले
भर पावसांत.

ओंकार

No comments:

Post a Comment