Friday, February 4, 2011

गुंता मनीचा

गुंतलेलं मनं बिरागी.
मानता मानेना....
एकांतात आज का..
मला शांतता लाभेना.
स्वतःच्या सावलीस आज.
नजर ओळखीना...
साराचं गुंता मनीचा हा कैसा...
सुटता सुटेना...

कोंडलेले विचार सारे...
आज मुक्त झाले...
एक एक रुप वेडं..
त्या खुळ्यांनी दाखवले,
त्या विचारांचा आदी-अंत...
ह्याचा थांगपत्ता लागेना...
साराचं गुंता मनीचा हा कैसा...
सुटता सुटेना...

गुंतलेला प्राण..आज..
पाप पुण्याच्या गर्तेत...
खुणावती....श्वास..मोल...
कवडीमोल...गुर्मीत...
त्या श्वासांचे गुढ गणीत
काही केल्या सुटेना...
साराचं गुंता मनीचा हा कैसा...
सुटता सुटेना...

ओंकार

No comments:

Post a Comment