महीनाभराचं माझं गणीत..
तो क्षणार्धात चुकवतो...
मी बसतो...पुन्हा खरडत...
हिसाबाच्या वह्या
तो...माझ्यावर हसत बसतो
त्याच्या अन माझ्यात..
हाच फरक...
मी...स्वतःत गुंतलेला...
कदाचीत गुंतवलेला...
अन..तो..मुक्त उधळलेला.....
वा-यासमान
गणीतातचं हरवलेला मी...
उगाचच..कल्पनांचे इमले बांधतो...
क्षितीजापारच्या नवविश्वाची...
उगाच फसवी स्वप्न पाहातो..
तो मात्र...येतो...
जगतो...
अन प्रत्येक -हुदयावर आपली
छाप नकळत सोडुन जातो...
ओंकार
No comments:
Post a Comment