Monday, January 10, 2011

कोणीतरी बोललं जगं बुडेल म्हणुन....

गर्दीची वेळ...
अन मी ही तसाच धक्के खात...
शेजारच्या सिटवर बोलणे सुरु....
2011 झाले .पुढल्या वर्षी 2012...
सारं जगं बुडेल....
खरचं...देवास ठाऊक?
सहज विचार डोकावुन गेला डोक्यात...
खरचं होईल...ते ..
पुसुन टाकील...समुद्र...
सगळ्या मानवी संकल्पनांना?
दुस-याच क्षणी दुसरा विचार..
नाही होणार 
कारण
एक एक करत...
जेंव्हा त्या पापाचा प्रत्येक घडा..
काठोकाठ भरेल..
अन तेंव्हा
त्या भगवंताच्या डोळ्यातुन अश्रु गळेल..
तेंव्हा अगदी तेंव्हाच...
त्याच्या शक्तीची तिव्रता
आपल्याला कळेल...
तोवर जगुन घ्यायचे...
एकदम अनलिमीटेड..

ओंकार

1 comment: