सारा पसारा...
कुठे भावनांचा...कुठे आठवांचा..
कुठे आसवांचा...
अन कुठे...त्या चुकार शब्दांचा..
अन त्या सा-यात
माझ्यातला "मी" कुठेतरी हरवलेला..
खरचं कुठेतरी हरवला...
त्या चुकार शब्दांच्या मोहजाळात अडकला..
कोणीतरी बोलले...बघीतले त्याला...
पाहीले शोधुन नाही सापडला..
शोधुन शोधुन दमलो जेंव्हा.
तोच खुळा "मी" समोर आला...
अन अचानक...त्याच्या ठावठिकाण्याचा
मज पामराला साक्षात्कार झाला....
आजवर होता जो माझ्यातच दडलेला..
तो शब्दांचे बोट पकडुन...मुक्त झाला..
आसवांत ओघळुन जाण्यापेक्षा...तो...
कुठेतरी शब्दांत "बोलका" झाला...
मी "मुकाच" राहीलो कायम..
तो मात्र बरेच काही सांगुन गेला...
माझ्या मनांत उगाच एक "गलका" झाला...
ओंकार
chhan ahe avadali kavita :)
ReplyDelete