मैफील रंगवू नका तुम्ही..
भैरवीही झाली...
माझे "अस्तीत्व" अजुनही...
अनिश्चीततेच्या
भोव-यात अडकलेले..
शोध चालु अजुनही....
माझ्या ओळखीचा.
सापडुदे ओळख
तोवर मैफील रंगवु नका तुम्ही
भ्रम...संभ्रम....दोन्ही...
माझेच...
विचारही माझेच...
अन कल्पनाही...
जन्मापासुन "मृत्यू" पर्यंतचा..
सारा प्रवास..
तोही डोळे मिटुन केलेला..
तोच गुंता सुटण्याच्या आशेवर..
अन मग...
पुन्हा एकदा निसटलेली गाठ....
मोक्षाची..
ती गाठ सुटुदे अलगद...
तोवर मैफील रंगवु नका तुम्ही
रंगवु नका तुम्ही....
ओंकार
No comments:
Post a Comment