Wednesday, January 12, 2011

श्वास दगाबाज..

त्याचं वय वर्ष सहा महीने...
अन श्वास अचानक दगा देणारे..
खेळता खेळता त्याक्षणी...
तो तसाच सिरीयस...
काय माहीत
कसं काय सहन केलं त्या माऊलीने..
कसं ते देवास ठाऊक...
खरचं..
म्हणे त्याच्या पत्रिकेत लिहीले होते...की...
नाही जगणार तो....जास्त..
पण तरीही..ती लढली....
प्रसंगी रडली...
अन पुन्हा सज्ज झाली
लढण्यासाठी...
सारं काही विसरुन...
लढा...त्या देवाविरुध्द....
प्राक्तनाविरुध्द....
प्रसंगी खिश्यात
पैसेही नसायचे....
हॉस्पिटलमध्ये भरण्यासाठी....
मग त्याच्यापायी...
ऐकुन घ्यावे लागलेले दोन शब्द....
मालकाकडुन...पैसे घेताना..
तसचं लढत राहीली...
जगली...
अन त्यालाही जगवलं...
खरचं ती कशी काय लढली
तीलाच ठाऊक
शिकवले...त्याला श्वासांचे मुल्य...
सांगीतलं की श्वास
"दगाबाज" आहेत तुझे..
अचानक साथ सोडुन जातात...
त्यासाठी त्याला मनापासुन तयार केलं....
दुःखामागुन सुखदेखील आले...
आजवर असलेली
सारी परीस्तिथी...बदलली...
तीने आपले अश्रु
कधीच मोकळे सोडले नव्हते...
कोणासमोरच....कधीच...
ते मुक्त ओघळले...
ते त्याच्या पगारातुन त्याने...
स्विटचा पहीला घास
तिच्या तोंडात भरवला तेंव्हा..
बाकी काही बोलली नाही...
बस इतकेच बोलली...
की माझे जिवन सार्थक झाले....
यशस्वी हो.......

ओंकार

2 comments: