Wednesday, January 19, 2011

आठवता ते दिवस.

आठवता ते दिवस..
डोळे भरून आले ..
खरचं...किती रम्य होते..
ते बालपणीचे दिवस..
नुसती धमाल..
शाळा....टेक्नीकल स्कुल..
आणी व्हॉलीबॉल...
आणी खुप सारी मस्ती...
शाळा...घर...
बाकी काही नव्हतच आयुष्यात.
तुम्ही खरचं...
कित्ती कित्ती रंग भरलेत ..
जेंव्हा रडलो...
तेंव्हा रडायला खांदा दिलात..
अन हसलो...
तेंव्हा मनमुराद...साथ..
खरचं..
आठवतात ते दिवस..
किती गोष्ठी..
अगदी सहजपणे सांगुन गेलो...
पुढच्या आयुष्याची स्वप्न
नकळत रंगवुन गेलो...
आजही ते सारे क्षण
अगदी लख्ख आठवतायत..
अगदी कालच घडल्यासारखे...
कालच घडल्यासारखे...

ओंकार
(DEDICATED TO ALL MY BEST FRIENDS FROM MY SCHOOL WHO KNOWS ME MORE THAN MYSELF)

No comments:

Post a Comment