Tuesday, January 4, 2011

भ्रम

भ्रमाच्या भोव-यात
तर आपण सारेच
अडकलेले...
नसलेल्या मृगजळाच्यापाठी
उगाच
हात धुवुन लागलेले.
नुसत्या कल्पनांचे इमले..
प्रत्येकानं सजवलेले...
अन प्रत्येक श्वास सरते..
त्यातच गुंतवलेले...
भ्रमाच्या त्या
बंदीखान्यातुन सुटणे...
इतकेही....सोपे नाही..
एक प्रयत्न हवा...मनातुन..
बस..
अशक्य नक्कीच नाही...

ओंकार

2 comments: