तुझ्याशिवाय..
त्यांस गवसुदे...थोडा अर्थ...
तोवर
कोणीच मैफील रंगवु नका...
नाही रोखु शकणार...
मी स्वतःला...
त्या खुळ्या शब्दांपासुन दुर...
पण...आज जवळ केलं
त्यांना..
तर...
त्या डोळ्यांचे बंध कोसळुन पडतील..
बंध होऊदे पक्के
तोवर मैफील रंगवू नका तुम्ही.
येईनच पुन्हा...
पुन्हा पुन्हा....
जगण्यासाठी....
त्याच शब्दांसोबत...
तुमच्या मनात खोलवर रुजण्यासाठी...
थोडा वेळ लागेल कदाचीत..
तोवर मैफील रंगवू नका तुम्ही.
ओंकार
No comments:
Post a Comment