Wednesday, April 16, 2008

ति मला विसरलीच नव्हती


जेंव्हा जेंव्हा मी काही लिहायला बसतो
तेंव्हा तुझा चेहरा अगदी नकळत डोळ्यांसमोर येतो
अन मग माझ्या मनात विचारांचे युध्द सुरु होते
आपले नातं अगदीच नवं होतं
एकमेकांना समजुन घेण्यात दिवस सरत होते
आठवणींमध्ये हरवण्यात रात्र बहरत होती
दिवस अगदी हळुवारपणे सरत होते
दिवस मला वर्षांसारखे भासत होते
तुझी ति माझी वाट पाहाणे
माझ्या अबोल शब्दांना समजुन घेणं
केसांची सतत डोळ्यांवर येणारी बट सावरणं
लपत छपत माझ्याकडे पाहणं
सारं काही मनामध्ये भरत होतं
आपल्या नात्याला ते कदाचीत अजुनच पक्के करत होती
म्हणतात ना चांगल्यानंतर वाईट दिवस येतात
आपलं अगदी तसचं झालं
आपलं घरटं बांधताबांधताच मोडुन गेलं
दोन वर्षे बोललो नाही एकमेकांशी
दोघेही नजरेआडुन पाहात होतो
जिवनात व्यस्त झाल्याचे नाटक करत
दुनीयेल्या सा-या फसवत होतो
भासवत होतीस तुही सारं काही विसरलीस
मित्र मैत्रीणींच्या घोळक्यात होतीस
मित्र मैत्रीणींच्या घोळक्यात होतीस
मनाच्या कुठल्याशा कोप-यात ठेवुन मला
आजही कदाचीत दोन टिपे गाळत होतीस

नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)

2 comments:

  1. अन मग माझ्या मनात विचारांचे युध्द सुरु होते
    शब्द परके होतात आणि आठवणिंचं तांडव सुरु होते.

    डोळ्यांसमोर परत तुझ प्रतिबिंब उभ राहतं
    हरवलेल्या त्या शणांना मन पुन्हा गोंजारत राहतं

    kshan kas lihtat te mala jamal nahi

    ReplyDelete
  2. आपले नातं अगदीच नवं होतं
    एकमेकांना समजुन घेण्यात दिवस सरत होते
    आठवणींमध्ये हरवण्यात रात्र बहरत होती
    दिवस अगदी हळुवारपणे सरत होते
    दिवस मला वर्षांसारखे भासत होते
    तुझी ति माझी वाट पाहाणे
    माझ्या अबोल शब्दांना समजुन घेणं
    केसांची सतत डोळ्यांवर येणारी बट सावरणं
    लपत छपत माझ्याकडे पाहणं
    सारं काही मनामध्ये भरत होतं

    आपल्या नात्याला ते कदाचीत अजुनच पक्के करत होती

    sahi aahe yaar!!!!!!!!

    ReplyDelete