Friday, March 28, 2008

आठवण


आठवण काय असते
कुणी समजावेल का जरा मला?
ही चांगली की वाईट
कुणी सांगेल का मला?
ह्यात असतो प्रेमाचा ओलावा
अन सोबत अम्रुताचा गोडवा
असतो शरीराला झोंबणारा वारा
अन अवचितच अश्रुंच्या धारा
असतात पावसातील थंड गारा
की विराण आयुष्याचा सहारा

सांगा ना आठवण नक्की काय असते?
आठवण एक विश्वास असतो
कुणीतरी सोबत असल्याचा
एक हक्काचा पर्याय असतो
स्वतःचे "मी" पण विसरण्याचा
असतो एक रस्ता
स्वप्नांच्या दुनीयेत जाण्याचा
आठवण कधी मनापासुन हसवते
कधी मनापासुन रडवतेही
आठवण यायला काही कारण लागत नाही
आठवण आली की मन स्थिर राहात नाही
कदाचीत म्हणुनच आठवण आपल्या मनाचे प्रतिबिंब असते

नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)

Wednesday, March 26, 2008

नातं शब्दांचे नि माझे




शेवट नेहमीच गोड व्हावा, असा नियम नाही
माझे नक्की काय चुकले साले,हेच मला कळत नाही
रडणारयांना हसवण्याचा प्रयत्ना करत् राहायचो
निराशा झालेल्यांना आशेचा किरण दाखवत राहायचो
संकटांना सामोरे कसे जायचे,हेच समजवात राहयचो
पण हेच सारं काही जेंव्हा माझ्याबाबतीत घडले
तेंव्हा मला समजुन घेणारं कुणी भेटलंच नाहे

मनाला समजवाण्याचा प्रयत्न केला अनेकदा
पण मनाने कधी ऐकलेच नाही
तेंव्हासोबत कोणीही नव्हते
ना मित्र ना नातेवाइक
ना प्रशंसक ना हितचिंतक

सोबत मला होती फक्त शब्दांची
ति तर कधी सुटणारच नव्हती
त्यामुळेच
नक्की नातं काय आहे
माझं नि शब्दांचे हेच कधी समजलेच नाही


नेहमीच तुमचाच


ओंकार(ओम)

भारतभुमी... एक सोनेकी चिडीया


भर दुपारच्या उन्हात आलयं माझ्या डोळ्यांत पाणी
कुठे सुकलेली पानं, कुठे कुस्करलेली मनं
सारं कसं अगदी ओसाड रानं भासतयं
अरे हे सारं कसं सहजपणे घडतंय
काय जाणे कुठे काय बिघडलंय?
अरे पण हे सारं कसं अश्रुंची धार लावतंय

कुठे पुराचे लोटं ,कुठे चक्क बॉंबस्फोट
कुठे पाण्याचे भास कुठे नोकरीतील त्रास
कुठे परीक्षांचा भार कुठे प्रेमात हार
ह्या सगळ्या गोष्ठीत आपलं हक्काचं मन हरवलंय
माणुसकीच्या शोधातं मन वेड्यासारखं भरकटतयं
अरे पण हे सारं कसं अश्रुंची धार लावतंय

बिघडलयं हे नक्की मग सुधारणारं कधी
दुसरा पुढे येण्याची वाट पाहणार किती
कधीतरी सगळी ही परिस्तिथी बदलायलच पाहीजे
पहीला प्रयत्न नेहमी आपणच केला पाहीजे
अस हातचे कांकण शोधण्यासाठी आरसा कशाला पाहीजे
हे सारं बदलण्यासाठी फक्त एकच सुरवात पाहीजे

आता सुरवात कशी करायची हे मला विचारु नका
दुसरयाला कमी लेखण्यात वेळ वाया घालवु नका
सगळे ठिक करण्याचा विश्वास मनात बाळगला पाहीजे
सोबत असण्यारयांची साथ पुर्ण द्यायला पाहीजे
मग पुन्हा एकदा डोळ्यांत आनंदाश्रु येतील
अन मग आपली ही भारतभुमी "सोने की चिडीया" होईल

नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)

नातं...


अनेक वर्षे भेटत असतो नाते असते मैत्रीचं
मनात कल्पनांचे इमले बांधत असतो
समोर आल्यावर मात्र गप्पच
तशी आहे ओळख आपली फार पुर्वीची

तासंतास गप्पा मारतो
दुनीयेची पर्वा करत नाही
सोबत असलो आपण तरीही मनातले काही सांगत नाही
कदाचीत तु समोर आल्यावर मला शब्दच सुचत नाहीत

नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)

Saturday, March 15, 2008

रोजच येतील


प्रत्येकाला प्रेमात पाडते ते प्रेम
वेगवेगळ्या रुपात भेटते ते प्रेम
रुपे अनेक असली तरी
भाव मात्र एकच असतो
दोन जिवांना जोडणारा
बंध मात्र सेमच असतो

नानाविविध रुपात ते भेटते
कधी शाळेच्या बाकावर, कधी कॉलेजच्या कट्यावर
कधी बागेतल्या झाडखाली ,कधी पावसात एकाच छत्रीखाली
अन आजकाल तर चक्क सिसिडीच्या दुकानातही भेटतेय

प्रेमात नसतात कुठलीच बंधने
त्याला स्वतःच्या पध्दतीने उमलायचे असते
नुसते लाल फुल देऊन भागत नाही
एकमेकांना समजुनही घ्यायचे असते
रोजच येती जिवनात प्रेमाचे भारदार क्षण
आपण फक्त ते खुल्या दिलाने अनुभवायचे असते

नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम

जिवन....हे असेच जगायचं असतं




सारं बदलुन जाते क्षणात जेंव्हा
वादळाची चाहुल लागते
अनं मग नव्या जगाची
सुरुवात हळुवार होऊ लागते

अंत की सुरुवात हे
प्रत्येकाने ठरवायचं असतं
मनाच्या सिमा रुंदावत
खिडकीबाहेर डोकवायचे असते

प्रत्येक गोष्ठीमागचे कारण असते
ते आपण समजुन घ्यायचे असतं
कधी गवताच्या पातीप्रमाणे नमायचे असतं
प्रसंगी वज्रासमान कठोरही बनायाचं असतं

निसर्ग शिकवतो अनेक गोष्ठी
आपण समजुन घ्यायचे असतं

जिवन.....हे असेच जगायचं असतं

नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)












Friday, March 14, 2008

मैफील


सुन्या सुन्या मैफीलीत माझ्या
येऊनी रंगुनी जा
जाताना थोडेसेच सजणे
आसु माझे घेऊन जा

जगण्याचे नवीन ध्येय
मला आज तु देऊन जा
अन मग माझ्या निरर्थक
जिवनाला अर्थ नवा देऊन जा

दोन क्षण हसण्याचे
कारण मला देऊन जा
दुखःतही हसण्याची
कला मला शिकवुन जा

माझ्या कल्पनेच्या पंखांना
नवे बळ देऊन जा
माझ्या ह्या वेड्या कवीतेतील
प्राणच तु बनुन जा

तुझे हासु मला लाभण्याचे
भाग्य मला देऊन जा
बाकी मागणे काही
नाही ग वेडे तुझ्याकडे
फक्त ही कवीता वाचताना
सारे नकळतपणे आठवुन जा

नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)

मला प्रेम करायला शिकायचे आहे


दाटुन येते मन माझे
जेंव्हा तुझी आठवण येते
तुझी आठवण आली की
नकळत डोळ्यांत पाणी येते
सारे जग विसरुन मला
कधीतरी एकटे बसावेसे वाटते
भावनांना रंग देऊन त्यांचा
एखादी कवीता नकळत बनते

दोन क्षण फक्त
मला बघायचे आहे
तुला मनापासुन हसताना
मला पाहायचे आहे तुला
स्वप्नामध्ये हरवताना
मला बघायचे आहे तुला
वादळांना सामोरे जाताना
संकटे आली अगणीत तरी
मनापासुन हसताना
मला बघायचे आहे तुला
स्वतःचे अस्तीत्व शोधताना

दोन क्षण फक्त
माझ्या मांडीवर डोके ठेवुन
तिलाशांत झोपताना पाहायचे आहे
तिचा शांत झोपलेल्या चेहरयावर
बघुन स्वतःशी स्मित करायचे आहे
माझे जिवन झरयाप्रमाणे अवखळ जगायचे आहे
पुन्हा जन्मेन तर फक्त तुझ्याचसाठी
तुझा चेहरा पाहातच जगायचे आहे

मला प्रेम करायला शिकायचे आहे......


नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)