Friday, March 28, 2008

आठवण


आठवण काय असते
कुणी समजावेल का जरा मला?
ही चांगली की वाईट
कुणी सांगेल का मला?
ह्यात असतो प्रेमाचा ओलावा
अन सोबत अम्रुताचा गोडवा
असतो शरीराला झोंबणारा वारा
अन अवचितच अश्रुंच्या धारा
असतात पावसातील थंड गारा
की विराण आयुष्याचा सहारा

सांगा ना आठवण नक्की काय असते?
आठवण एक विश्वास असतो
कुणीतरी सोबत असल्याचा
एक हक्काचा पर्याय असतो
स्वतःचे "मी" पण विसरण्याचा
असतो एक रस्ता
स्वप्नांच्या दुनीयेत जाण्याचा
आठवण कधी मनापासुन हसवते
कधी मनापासुन रडवतेही
आठवण यायला काही कारण लागत नाही
आठवण आली की मन स्थिर राहात नाही
कदाचीत म्हणुनच आठवण आपल्या मनाचे प्रतिबिंब असते

नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)

1 comment:

  1. आठवण काय असते हे तर ज्याला आठवण येते तोच सांगू शकेल. खूप छान कविता आहे.

    ReplyDelete