Monday, February 8, 2010

.


आज ब-याच दिवसांनी बाहेर पडलो घरातुन
इतके दिवस स्वतःला कोंडुन घेतले होते मी
का ते माहीत नाही?
पण आज थोडं बरं वाटलं !!
भटकतं भटकतं पोहोचलो एका दुस-याच गावात
इथल्या गर्दीत हरवुन जो तो केवळ धावत होता
कोणालाच कोणाची पर्वा नव्हती
कशाला करेल पर्वा
प्रेम... माया... नाती-गोती
ह्या सगळ्याला इथे किंमतच नव्हती
पैसाच सगळ्यांचा इथे नातलग होता
कोणीच कोणाला ओळखत नव्हते
असाच फिरता फिरता एके ठिकाणी
माझी पाऊलेच थबकली
पुढे जाऊच शकत नव्हतो
सहज म्हणुन डोकावलो त्या गर्दीत,
कोणीतरी रडत होते
आणी समोर एक शव होते
ते शव कोणाचे होते माहीत नाही
पण ती म्हातारी मात्र धाय मोकलुन रडत होती...
बिथरली होती….
मी गर्दीतुन पुढे सरसावलो
तिच्या थरथरत्या हातांवर हात ठेवत मी बोललो
चल म्हातारे मी करतो मदत तुला...
त्याचे शव मीच उचलून नदीच्या तिरावर नेले
तो माझा कोणीच लागत नव्हता
तरीही मी त्याचे अंत्यसंस्कार केले
म्हातारी पार कोसळली होती
तिच्या लेकराला मातीत मिसळताना
बघण्याची वेळ आज तिच्यावर आली होती

नेहमीच तुमचाच
ओंकार

No comments:

Post a Comment