Thursday, September 30, 2010

आता कुठे जगायला शिकलोय....

आताशा मनाला,
माझं म्हणायची पण लाज वाटतेय,
इतके ते परके झालयं
तुझ्या आठवणींच्या दाट धुक्यात हरवुन,
ते आजकाल माझ्यापासुनचे दुरावलयं...
तु..... 
तुझ्या आठवणी......
तुझ्याचसाठी... तुझ्याचसाठी....
काही कळत नाहीय नक्की... 
असं का होतेय...
भेटणे तर दुर....
स्वप्नातही तुझ्या येणार नाही...
असे ठणकावुन दुर गेली होतीस..
मग का येतेस?
आजकाल स्वप्नात...
का येतेस?
पुन्हा एकदा छळण्यासाठी...
आता कुठे सावरलयं.... स्वतःला....
अंगणातल्या गुलमोहोरालाही..
आता तुझ्याशिवाय खुलण्याची सवय झालीय...
पण माझे मन का? 
पुन्हा तुझ्याचकडे धाव घेतयं?

आता... 
पुन्हा ते सारं बघण्याची... 
ऐकण्याची...
वाचण्याची ताकद..
नक्कीच माझ्यात नाहीय...
फार मुश्कीलीने आता
डोळ्यातले अश्रु लपवायला शिकलोय....
आता.. पुन्हा ते सारं नकोय....
कधीच नकोय...
आता कुठे जगायला शिकलोय....



ओंकार...

1 comment: