Thursday, September 30, 2010

आज पुन्हा एकदा पाहीले तुला (उत्तरार्ध)

सारे काही मनात दाबून ठेवले होते गं
पण त्या दिवशी तू सहज शेजारुन गेलीस
मी आजही वळलो अगदी नेहमीसारखंच
तुझ्या आठवात पुन्हा मी दरवळलो ...
अपेक्षा इतकीच होती की,
तू मागे वळशील माझ्यासाठी...
पण तू निघुन गेलीस
अन मी गर्दीत हरवलेला तसाच...
आज पुन्हा एकदा ...
मिसळलो आज पुन्हा नव्याने
जगण्यासाठी की मरण्यासाठी
पुढे पाऊल तर टाकवतच नव्हते ...

अन मागेही वळणे शक्य नव्ह्ते
पण तरीही भावना माझ्याच मी
पायदळी तुडवत रहिलो..
तूही गेलीस नजरेच्या टप्प्याआड
पण तरीही मी तसाच उभा
जणू मी या तिरावर अन तू त्या....
अन आपल्या दोघांमध्ये पसरलेला
हा अथांग दुरावा....
कदाचित कधीच न संपणारा...
दोघेही एकमेकांकडे पाहत
पण पुढे पाऊलच टाकत नव्हते ...

पाऊस कोसळला अन मी
तसाच भिजत चालत राहिलो ,
डोळ्यातील तुझी ती प्रतिमा साठवून घेत
आज पुन्हा एकदा... वादळचं सुटले होते
अलवार जपून ठेवलेल्या आठवणी
पुन्हा मनात अस्ताव्यस्त पसरलेल्या
त्याच साठवत ..आज पुन्हा एकदा
वेचू पाहतोय एक एक आठवण..

अगतिकतेने रिकामीच राहिलेली माझी ओंजळ
भर पावसातही डोळ्यातुन ओघळणारे तुझे प्रेम
मी मनात साठवले होते अन...
इतके दिवस लपवून ठेवले होते जे जगापासून ...
आज दडवू पाहतोय स्वतःपासुन...
पण ते अव्यक्त प्रेम आज पुन्हा एकदा व्यक्त झाले
अन व्यक्त होऊनही अव्यक्तच राहीले
पुन्हा पावसात भिजण्यासाठी..

--- अबोली आणि ओंकार

No comments:

Post a Comment