Thursday, September 30, 2010

प्रश्न...........


तेच ते... नेहमीचे...
तरीही सारे काही नवीन....
उगाचच धावत राहतो आपण...
त्याच आखुन दिलेल्या रिंगणात....
कारणाशिवाय......
दमलो की विचारात पडतो....
का धावलो.... काय मिळवण्यासाठी......
पुन्हा एक नवा प्रश्न....
प्रश्न पाचवीलाच पुजलेला....
असेच प्रश्नांमागुन प्रश्न...
फक्त सतावणारे......
गुंता करुन विचारांचा,
स्वतःमध्ये गुंतवणारे.....
उगीच जिवाला घोर लावणारे......
गुरफटलो.... अडकलो .....
की एकटे सोडुन जाणारे....
नकळत फसवणारे...
ओक्साबोक्षी रडवणारे...
अवचीत हसवणारे.....
शब्दगंध खुलवणारे.....
सकाळच्या कोवळ्या उन्हात,
दवबिंदुंसम ओघळणारे....
प्रश्न कणांकणाने मारणारे.......
धावत्या वाटेवरती,
ओळखीच्या पाऊलखुणा शोधणारे......
अलगद अडखळणारे....
त्या कान्ह्याच्या मोरपिसासम,
मंजुळ तानेवर डोलणारे......
प्रश्न मनात कल्लोळ उठवणारे......
काहीसे बोलके....... बरेचसे मौन.....
प्रश्न तुला नी मला व्यक्त करणारे.....
प्रश्न मनातली गुपीते फोडणारे.....
प्रश्नांत दडलेले प्रश्न....
विचार करायला लावणारे.....
प्रश्न आयुष्याला नवे ध्येय देणारे...
अंधा-या वाटेवर दिपस्तंभासम दिशा दाखवणारे.....
प्रश्न हरणारे.... हरवणारे...
प्रश्न संपणारे.... संपवणारे......
प्रश्न तुला नी मला दुर नी जवळ आणणारे...
प्रश्न आयुष्य बनुन जाणारे.....
आयुष्य बनुन जाणारे....

ओंकार व अबोली..

No comments:

Post a Comment