चिरफाड तर केंव्हाच केली.. होती मी माझ्याच विचारांची.. तुझ्यापायी..थांबलेल्या.. त्या प्रत्येक क्षणांची... नाही जमला मात्र मला... अजुन तुझा माझा मेळ.. बस तुझा आपला...खेळ.. फक्त ....खेळ मांडलेला डाव .. अन सांडलेला घाव... सोडलेला गाव.. नाही कुठे कुणाचाही ठाव.. बस..ह्या सर्वांत माझ्या ओळखीचा उरलेला "मी" मोडक्या स्वप्नांची बिदागी घेऊन.. आयुष्य कंठणारा.. कण्हत कण्हत फक्त ....खेळ
No comments:
Post a Comment