Thursday, November 17, 2011

सहजच



आज मी हरलो त्याचे..
काहीही शल्य मनास नाही.
वचन तुला जिंकवायचे..
मीच देऊन बसलो होतो         
मी सहजच उलगडत होतो

झालो मी निःषब्द
समोर तु असताना
वचनात त्या दिलेल्या
सहजच फसलो होतो
मी सहजच उलगडत होतो

येतेस तु नव्याने..
नवपालवी पांघरुनी
रुपात तुझ्या फसव्या
आजही गुंतलो होतो
मी सहजच उलगडत होतो

येतेस तु सखी अशी
बनुनी तान बासरीची
डोळ्यांत तुझ्या मी
आभाळ शोधत होतो
मी सहजच उलगडत होतो

मी लिहीत गेलो...
अव्यक्त भावनांना
शब्दांत गुंतुनीया..मी
कविता बनवित होतो
मी सहजच उलगडत होतो

मी असाच जगत होतो..
सहजच उलगडत होतो..
मिठीत तुझ्या कोसळताना
मी पावसाला लाजवत होतो
मी सहजच उलगडत होतो

ओंकार

1 comment:

  1. प्रयत्न करुनी मी थकलो
    हातात हात ना आला
    मग प्रयत्न केला अजुनी
    दाद ना मजला मिळता
    यत्न ते अनिवार झाले
    परी अधिकच गुंतत गेलो
    आता नकोच काही ...
    केला विचार मी भला
    अन करताच विचार असला
    मी सहजच उलगडून गेलो ...

    ReplyDelete