Monday, November 7, 2011

दर्द अनामिक

आज समोर पाहाताच तुला
शब्द ओठांआडच दडले होते..
मन मात्र त्याच आठवणींनी
पुन्हा नव्यानेच पाझरले होते

शांतचित्त मी..जगत होतो..
स्वप्नांमधील वाटांवर चालताना
सजवत होतो शब्दांत माझ्या
चेहरा तुझा सये तो हसताना

सजली मैफील रात ही उजाड
क्षणांत सारी सजुन गेली..
रातराणी खुळी तुझ्या स्पर्शाने.
आज अवेळी का बहरुन आली?

उगाच रुसणे तुझे सखे...
अन उगाच माझे समजावणे
असेच अनाहुत खुलणारे
ते तुझ्या माझ्या प्रितीचे तराणे

भेट आपली जन्मोजन्मीची..
खुण पाठी नव्याने सांडणारी..
नाते आहे काय तुझे नी माझे
जणू हेच नव्याने रोज सांगणारी

आलीस तु जवळी माझ्या अन.
आयुष्य माझे बनुन गेलीस..
अन लोकांस मात्र उलगडणारा
तो दर्द अनामिक होऊन गेली

विसरलो मी आज पुन्हा
त्या खुळ्या संकल्पना नात्याच्या
ये...फक्त एकदाच परतुनी
होऊन जा अर्थ माझ्या कवितांचा

ओंकार

No comments:

Post a Comment