Sunday, April 8, 2007

पुन्हा एकदा पुन्हा एकदा काव्य मला करायचे आहे......




ह्या कवीतेतला कवी हा आपल्या मित्र मैत्रीणींना सोडुन दुर चालला आहे हे त्याचे सोडुन जातानाचे काव्य आहे, त्यांना आपण सोडुन् जातोय आपल्या मित्र मैत्रीणींना ह्याचे त्याला फार दुख आहे पण सोबत एक आशाही की तो एकदिवस नक्की परत येणार. कोणाच्याही खाजगी जिवनावर ही कवीता लिहीलेली नाही. जर कुठेही अशी आढळली तर तो निव्वळ योगायोग समजावा. :- ओंकार



पुन्हा एकदा पुन्हा एकदा
काव्य मला करायचे आहे,
पुन्हा एकदा पुन्हा एकदा
मनसोक्त मला हसायचे आहे.

पुन्हा एकदा पुन्हा एकदा
स्वप्नांच्या दुनीयेत जायचे आहे,
पुन्हा एकदा पुन्हा एकदा
भावनांच्या हिंदोळ्यावर खेळायचे आहे.

पुन्हा एकदा पुन्हा एकदा
शब्द मला जुळवायचे आहेत,
पुन्हा एकदा पुन्हा एकदा
कवीता मला करायच्या आहेत.

पुन्हा परतुन मी असे एक काव्य करणार
तुम्हा सर्वांना दाखवुन ते शाबासकी तुमची मिळवणार,
आज ना उद्या मी परत इथे येणार
भावना माझ्या व्यक्त करण्याचा सच्चा प्रयत्न करणार.

पाहाल ना तुम्ही वाट थोडी तुमच्या ह्या मित्राची
आहे सोबत आता मला तुमच्यासोबत घालवलेल्या क्षणांची,
आठवण तर नेहमीच राहील मनामध्ये तुमची
तिच तर जागवत राहील इच्छा पुन्हा परतण्याची.

काव्य देत राहाते शक्ती दुःखे पचवण्याची
आणी सोबत देत राहाते सुखेही वाटण्याची,
मजेमध्ये तुमच्यासोबत जिवन माझे जगण्याची
आणी त्याद्वारे आयुष्याचे सार आज समजण्याची.

नेहमीच तुमचा
ओंकार(ओम)

No comments:

Post a Comment