Monday, April 30, 2007

कालचा पाऊस



आज एकडे पाऊस,
आज तिकडे पाऊस,
तिथे ढगांत दाटला,
इथे डोळ्यांत दाटला.

भिजायचा आनंद लुटताना,
आसु डोळ्यांत लपवताना,
नेहमीच साथ माझी देणारा,
आहे सखा माझा पाऊस.

कधी वाटतो हवासा,
कधी नकोसा पाऊस,
आहे रोजचा तरी ,
नवानवासा पाऊस.

तिच्या ओल्या आठवणींनी,
चिंब भिजलेला पाऊस
प्रेमीकेली घातलेली,
आर्त साद हा पाऊस.

सोसायला शिकवणारा,
अनेक दुःखे हा पाऊस,
नंतर इंद्रधनुष्यी रंग,
दाखवतो हा पाऊस.

आठ्वतो का ग तुला,
प्रिये कालचा पाऊस,
मनात ओथंबलेला,
सखे कालचा पाऊस,
आहे रोजचा तरी .
आजचा वेगळा पाऊस

नेहमीच तुमचा
ओंकार (ओम)

No comments:

Post a Comment