Monday, February 8, 2010

कृष्णछाया :- सांग ना.....


मी अजुनही
तिथेच उभा होतो .....
त्याच वळणावर.....
वाटत होते.....
की तु पुन्हा एकदा मागे फिरशील.....
धावत येऊन मला बिलगशील......
पुन्हा एकदा....
पण.....
क्षणार्धात तु इतकी दुर गेलीस....
कुठे कमी पडलो होतो मी
की तुला तुझी वाटच बदलावी लागली
बोलतेस....
अजुनही तु माझ्यावर प्रेम करतेस......
खरचं?
सांग ना ?
मग तरीही
असे का वागलीस......
इतकाही वाईट नाहीय गं मी.....


Contd.....

कृष्णछाया :- दुर... खुप दुर....


ह्या सगळ्यापासुन आता मला दुर जायचेय
दुर... खुप दुर....
सगळं कसे अनपेक्षीत घडतेयं
नुसता गुंता झालाय
आत मनात विचारांचा
डोक्यावरचे भितीचे भुत उतरण्याचे
नावच घेत नाहीय
सतत कोणती ना कोणती
तलवार टांगलेली डोक्यावर....
पण आता हे ओझे वाहाण्याचा
मनस्वी कंटाळा आलाय
कोणीतरी समजुन घ्या
का मी रडतोय, तडफडतोय, तुटतोय
कोणालाच काहीही पडलेलं नाही
जो तो आपापल्या प्रश्नांत गुंतलेला
हरवलेला
माझे प्रश्न सोडवु नका
पण निदान
माझ्या डोक्यात नवा प्रश्न तरी सोडु नका
का विसरता सगळेच
की शेवटी मीही एक माणुस आहे
माझ्याही भावना आहेत
सगळ्यांचा विचार करता करता
आता स्वतःसाठी जगणेदेखील विसरुन गेलोय....
कित्तीदी विचार केला की
आता विचार करत बसायचे नाही
रडायचे नाही
आता इतर कोणासाठीही जगायचे नाही
बस......
आता संपवुन टाकायचेय स्वतःला
ह्या सगळ्यातुन मुक्त होण्यासाठी


Contd.....

“कृष्णछाया”


वेड्या आठवांची वेडीच साठवण
कोणी जगतोय कोणासाठी…..
कोणालाच माहीत नाही
पण तरीही प्रत्येक जण जगतोच.....
सगळेच एका अनामीक नात्यात गुंतलेले.....
त्या कृष्णवेड्या मीरेसारखेच…….
कृष्णप्रेमात गुंग होऊन रमलेले......
आजवर कित्तेकदा ह्याचा भावार्थ शोधुन पाहीला पण....
हाती लागली ती केवळ निराशाच
मुठ उघडल्यावर,
हातातुन वाळु निसटते
अगदी तसाच…..
हा जन्म देखील भुरकन सरुन जाईल
मग मागे उरतील…..
त्या केवळ “अस्तित्वाच्या खुणा” ....
काही “वाटांवर”….. काही “-हुदयांवर”.....
“प्रेम”......
अशी नक्की कसली जादु आहे……
ह्या शब्दात
की जो तो... केवळ
ह्याच्या पाठी लागलेला
कृष्ण म्हणजे... काळा.....
आणी कृष्ण म्हणजेच प्रेम .....
सारं काही
एका क्षणात घडते बिघडते....
सारं कसं ……एकाच क्षणासाठी....
कोणी “प्रेमासाठी” मरतो,
कोणी “प्रेमापायी” मरतो...
का? इतकं सारं घडवतं हे प्रेम....
तुला नी मला जवळ आणतं
अन दुर नेतं ते हेच प्रेम....
त्या काळ्या प्रेमाची काळीभोर छाया...
“कृष्णछाया”
बस.......


नेहमीच तुमचाच
ओंकार

आता मी स्वार्थी होणार.....


विस्कटलेला डाव, कोसळलेलं घरटं....
फुटलेलं काळीज अन बिथरलेलं मनं
एकच गुलाब
पण तेही काटेरीच
लाख जपायचा प्रयत्न केलाय
आजवर त्याला
पण शेवटी तेही कोमेजलेच.....
आजवर कोणाकडुनच काहीही मागीतले नाही ....
काहीच नाही
भावशुन्य विश्वात जगत होतो
सगळ्यांना सांभाळत....जपत
स्वतःच्या सावलीलाही घाबरत
स्वतःला दिवसांगणीक मारतच होतो....
मी...... माझे........ माझ्यासाठी.....
ह्या गोष्ठींना काही थारच नव्हता
माझ्या आयुष्यात
जे काही होते ते फक्त तुझेच होते...
तुझ्याचसाठी होते
आपल्या स्वप्नांना मी त्यादिवशीच आग लावलीय
आता त्या सप्तरंगी स्वप्नांची राख
चेह-याव्र फासुन
आता जगायचा विचार चाल्लाय.....
कोणी निंदो कोणी वंदो.....
आता कोणासाठीच जगायचे नाही
कोणाचसाठी नाही.....
आता बस्...
मी आणी मी
किंवा कदाचीत
मी विरुध्द मी बस्...
ठरवलेय मी
की आता मी स्वार्थी होणार.....
नेहमीच तुमचाच
ओंकार

रंगमंच


मला जगायचयं
मला जगायचयं
पुन्हा जगायचयं…..
पुन्हा एकदा नव्याने जगायचयं
ह्या सगळ्याच गोष्ठीतुन
बाहेर पडुन मला
पुन्हा एकदा हसायचयं
खारं पाणी डोळ्यामधलं……..
आता मला टिपायचयं
त्याच डोळ्यात नव्या जगाचं
स्वप्न मला पाहायचयं
निदान त्या स्वप्नांसाठी
तरी आता मला जगायचयं
नव्या उमेदीचे पंख पसरुन
मुक्त आभाळात मला उडायचयं
मला जगायचयं
मला जगायचयं
पुन्हा एकदा नव्याने
आत्ता पुन्हा कोलमडायायचे नाही
रडायचे नाही, कोसळायचे नाही
बस...... स्वतःसाठीच जगायचयं
प्रत्येकाच्या –हुदयावर
स्वतःची एक छाप सोडुन जायचयं
ह्या रंगमंचावर
विदुषक म्हणुन कायम जगलो
आत्ता माणुस म्हणुन जगायचयं
आत्ता जगायचयं
आत्ता जगायचयं बस.....
माणुस म्हणुन जगायचयं
तु कोण? तुझी लायकी काय?
मला जाब विचारायचा तुला हक्कच काय?
आजवर काय दिलेस मला
ज्यासाठी हा हक्क मागतेस?
दिलेस ते केवळ अश्रु
आता कोणा हसवणारी साठी जगायचयं
माझ्यासाठी जगणारी.....
आता फक्त तिच्यासाठी जगायचयं
मला जगायचयं
मला जगायचं
पुन्हा एकदा मला जगायचयं
आता फक्त तिच्यासाठी………………

नेहमीच तुमचाच
ओंकार