अरे पोरा व्हं की रं बाजुला.....
काय साहेब उचलु का बोजा,
लवकर बोला...
बस.... स्टेशनवर अडकलेला...
लाल डगल्यात...
ओळख.....
फक्त बिल्ला...
नावाशी काय देणं घेणं....
आपुन लय फ्येमस माणुस....
त्याच नेहमीच्या गर्दीत अडकलेला
सायीड सायीड ओरडत...
तोंडातल्या तोंडात
दोन-चार शिव्या हासडीत....
उद्या असाच अनामीक गर्दीत हरवेल
तो
नी दुसरा कोणीतरी येईल
सायीड सायीड ओरडत...
ओंकार
राजे तुमच्या राज्यात
सगळ्याचा नुसता बट्याबोळ झालाय...
तुमच्या चरणाने पवीत्र झालेल्या भुमीत
नुसता भ्रष्ठाचाराचा पुर आलाय,
"कॉमनवेल्थ" नावाचा
एक भलताच वायरस भारतात आला...
"कॉमन"मँनची "वेल्थ" लुटण्याचा
सरकारी परवानाच जणु लांडग्यांना मिळाला...
रोज वाहातात आज इथे रक्ताचे पुर...
राजे हे सारं पाहुन तुमचाही भरुन येईल ऊर....
काळाची गरज आहे घडी स्वराज्याची बसवुया,,,
या राजे तुम्ही परत या,,,
मराठ्यांच्या नशीबी अजुनही
दुहीचीच मेख आहे,,,
फे-यात अडकुन गटा-तटांच्या
मराठी मुलुख तिष्ठत आहे...
आपण जगवला...
शंभुराज्यांनी वाढवला...
तो महाराष्ठ्रधर्म आज पुन्हा जगवुया.... वाढवुया....
या राजे तुम्ही पुन्हा परत या....
रघुकुलोत्पन्न आपण हे इथले काही लोक विसरले...
श्रीरामाचे अस्तित्व नाकारत चक्क कोर्टातही काही गेले
आज प्रभु रामचंद्रांचे अस्तित्व कोर्टानेही मान्य केले...
त्यांस रघुकुलाची श्रेष्ठ तत्वे शिकवुया...
या राजे तुम्ही परत या....
मेघडंबरी सुनी राहुन कंटाळलीय....
दुर्गराज आज पाहतोय वाट...
तख्थ पुन्हा एकदा मांडण्याची,,,
नगारखाना.... तोफा गर्जतील जोमाने
सांगताना विरगाथा मराठ्यांची....
ह्या मराठेशाहीसाठी सांडले रक्त अनेकांनी
त्या ज्ञात अज्ञात विरांना आठवुया
या राजे तुम्ही खरंच परत या......
ओंकार
आरशात स्वतःचाच चेहरा आताशा,
अनोळखी वाटु लागलाय
का जगतोय आणी कोणासाठी,
आता हा प्रश्न पडतोय..
तिच्यासाठी वा तिच्या वेड्या आठवांसाठी...
काहीच कळत नाही
जगण्याचे ध्येय माझ्या,
काही केल्या सापडत नाही
भासांच्या ह्या भोव-यात
खोल खोल गुरफटलोय
ह्या अगतीकतेचा अंत
का गवसत नाही?
अथांग सागराला मनाच्या
सोशीक किनारा सापडत नाही?
आता कळतेय की
क्षितीज कितीतरी दुर होते..
मृगजळाच्या मागे धावत होतो नुसता....
दिशाहीन....ध्येयहीन
काहीच नव्हते
कोणीच नव्हते...
साथ दयायला
मला समजवायला
बस ह्या जगात जगत होतो निमुटपणे
काटेरी पाऊलवाटा
पायाखाली तुडवत होतो
भळभळती जखम मात्र लपवत होतो
जगापासुन ....
तुझ्यापासुन...
तुझ्या पायाखाली मखमल पसरली
मी मात्र तसाच
जळत्या निखा-यांवरुन चालत
पोळलेले पाय लपवत
चेह-यावर खोट्टं स्मित
सारं नाटकी........
आता खुप दमलोय....खुप थकलोय...
आता काहीच सुचत नाही
इतके दिवस ज्याचासाठी धावलो
ते केवळ दिवास्वप्न ठरले
निवांतपणाचे चार क्षण शोधत होतो
आता डोळ्यात खुपतायतं
त्या तुझ्या आठवणी...
अन् तु आणी मी
एकत्र घालवलेले ते भावक्षण
त्या एकत्र जगण्याचा आणाभाका
कापरासारख्या उडुन गेलेल्या...
तुझ्या आठवणींत घुसमटलेला मी
अगतीक असहाय्य
सारे काही अगदी होते तसेच
पुर्वीसारखे
सारे काही जिथल्या तिथेच...
घड्याळाचे काटे कोणीतरी
धरुन ठेवावेत....
आताशा श्वासही गुदमरतो
तुझा विचार करु लागलो की
वाटते संपवुन टाकवे स्वतःला
ह्याक्षणी
ह्या त्रासातुन मुक्त व्हावे कायमचे
अगदी कोणाच्याही नकळत
अनं स्वत:च्याही....
मिटुन जावे
पुन्हा कधीही न उमलण्यासठी...
पण....
पण.... पण कोणासाठी मरायचे?
कोण तू? कुठली तू?
काय दिलेस मला तू आजवर
नात्याच्या नावाखाली डोळ्यात पाणी
ओठांच्या आड दडवलेला
तो हुंदका बस्स....
का रडू तुझ्यासाठी?
आणखी काही तू देउच शकली नसतीस मला....
तुला ते जमलेच नसते कधीच
देण्याचा अर्थ तुला कळलाच नाही कधी
ते समाधान तुला उमजणारच नाही कधी....
:-
अबोली आणी ओंकार
तावदाने खोलुन खिडक्यांची बाहेर बघायचे राहुन गेलं
तिच्यासाठी जगताना स्वतःसाठी जगायचचं राहुन गेलं
जळी स्थळी काष्ठी पाषाणी तेंव्हा प्रेम दिसत होत
इंद्रधनु मधुन हसत होतं....ढगांमधुन बरसतं होतं
आताही हसतंय ते आकाशीचा चंद्र बनुन
आताही बरसतेय तेच प्रेम डोळ्यांतल खारं पाणी बनुन.
आयुष्याच्या प्रत्येक पावलावर आता तुझेच नाव लिहीलेय...
शब्दंशब्द जुळवुन मी माझं हक्काचं जग सजवलंय....
ह्या माझ्या जगात कोणाच्याही नशीबी विरह नाही....
आठवणीमध्ये झुरणे नसेल ... डोळ्यांमध्ये पाणी नसेल....
मुक्त आभाळात उडण्यासाठी आता कोणाचे भय नसेल...
हळुहळु सुटणारा हात नसेल..... भिजलेली पायवाट नसेल...
आजवर नुसता नाचत होतो नशीबाच्या तालावर कटपुतली बनुन....
पण आता मात्र स्वतःच्या नियमांनुसार जगायचयं
सारी नाती तुच तोडलीस..... सारे बंध तुच तोडलेस....
नव्या जगाशी आता तुझा काही संबंध नको...
तु परत येऊच नको..
ओंकार
इतके दिवस झाले,
तुझ्याशी बोललो नाही
काय काय चालु आहे मनात माझ्या...
कोणालाच सांगीतले नाही.....
आजकाल कोणाशीही....
मनापासुन बोलणे होत नाही
किंबहुना मीच करत नाही
पण का कोणास जाणे
अनामीक हुरहुर मात्र कायम मनात राहाते..
पुन्हा
अचानक कोणाशीतरी,
सुर जुळु लागतील.....
शब्द जवळ येऊन दोन मनातले,
पुन्हा कवीता बनु लागतील
मन कोणासाठीतरी खुळं होईल.....
सारं काही विसरुन जाऊन,
पुन्हा एकदा पिसं होईल.....
पण आता ह्यातलं काहीच नको.....
रात्र रात्र जागुन स्वप्न रंगवणं नको.......
मी बरा.... माझी स्वप्नं बरी....
माझी एकट्याची पाऊलवाट बरी....
बाकी कोणीच नको.... काहीच नको.....
सारी सुरावट मीच मोडुन टाकलीय.....
नात्यांची घडी मीच विस्कटुन टाकलीय.....
पुन्हा बंध नको.... बंधने नको......
डोळ्यांत मिलनाची स्वप्नेही नकोत....
तु जाताना माझ्या वाटेवर जे निखारे पसरलेस..
तेच वेचत चाललोय...... त्याच वरुन.....
फक्त एका वेड्या आशेवर....
की कधीतरी माझ्या डोळ्यांतील,
त्या स्वप्नांची सप्तरंगी राख अश्रुंत भिजुन सरुन जाईल
अन सोबत असतील ते फक्त धडधडणारे श्वास......
पण ते तरी माझे असतील? कोणास ठाऊक?
आपल्या मिलनाच्या सगळ्या खाणाखुणा,
आता पुसट होत चाल्यात.....
अश्याच एखाद्या अंधारलेल्या वळणावर,
मला हरवुन जायचेय...
कोणाच्याही नकळत....कोणाच्याही......
मग आठवणींत उरेल तो माझा चेहरा तोही
अस्पष्ठ..... पुसट........
ओंकार