Friday, October 1, 2010

तु परत येऊच नको..



तावदाने खोलुन खिडक्यांची बाहेर बघायचे राहुन गेलं
तिच्यासाठी जगताना स्वतःसाठी जगायचचं राहुन गेलं
जळी स्थळी काष्ठी पाषाणी तेंव्हा प्रेम दिसत होत
इंद्रधनु मधुन हसत होतं....ढगांमधुन बरसतं होतं

आताही हसतंय ते आकाशीचा चंद्र बनुन
आताही बरसतेय तेच प्रेम डोळ्यांतल खारं पाणी बनुन.
आयुष्याच्या प्रत्येक पावलावर आता तुझेच नाव लिहीलेय...
शब्दंशब्द जुळवुन मी माझं हक्काचं जग सजवलंय....

ह्या माझ्या जगात कोणाच्याही नशीबी विरह नाही....
आठवणीमध्ये झुरणे नसेल ... डोळ्यांमध्ये पाणी नसेल....
मुक्त आभाळात उडण्यासाठी आता कोणाचे भय नसेल...
हळुहळु सुटणारा हात नसेल..... भिजलेली पायवाट नसेल...

आजवर नुसता नाचत होतो नशीबाच्या तालावर कटपुतली बनुन....
पण आता मात्र स्वतःच्या नियमांनुसार जगायचयं
सारी नाती तुच तोडलीस..... सारे बंध तुच तोडलेस....
नव्या जगाशी आता तुझा काही संबंध नको...
तु परत येऊच नको..


ओंकार

No comments:

Post a Comment