Sunday, October 31, 2010

आयुष्य म्हणजे...

नुसता स्वतःतल्या...स्व..चा शोध...
आयुष्यभर धावुन पाऊलेही थकलेली...
काही पाने कोमेजुन उगाच...
पहुडलेली.....वाळलेली..
पत्यांच्या डावातले...
पत्तेही आपलेच..
अन वाटणारे हातही...
तरीही....होतो....एखादा डाव उधळलेला
जगण्यापेक्षा....लढणं महत्वाचं आयुष्यात,,,
निदान हरलो तरी मनाला एक तसल्ली असते...
पडलो जरी कोसळुन तरी...
पडण्याआधी लढल्याची.
आपणचं मांडलेल्या डावांत...
स्वतःच गुंतुन पडलीय ती...
अशी का स्वतःच्या शब्दांना आज विसरलीय ती..
कोण खरं होतं म्हणायचे,
ती का तीचे ते शब्द?
आयुष्य ह्यालाच म्हणतात..
आज हसणारे दुस-यावर,
उद्या एकांतात रडतात....
रडगाणं झिजतं ते त्यांचे नेहमीचं...
तेंव्हा ते महाभाग ....नशीबाला दोष देतात,,
जगलो....श्वासांसाठी......
स्वप्नांसाठी...शब्दांसाठी...
तिच्यासाठी...
पण ह्या सगळ्या गोंधळात
उगाच का बोंबाबोंब..
सगळी शांतता असताना...
कशापायी सारी आदळाआपट...
समोरच उत्तरे असताना
गोठलेले शब्द...
कधी वितळतील का?
त्या शब्दांचे मनोगत..
कधी व्यक्त तरी होईल का?
शब्द वाट चुकले तरी..
तुझ्या आठवांचा माग घेतील..
त्या वाटांवरील तुझ्या पावलांचा....
अलगद तुझा वेध घेतील...

ओंकार

No comments:

Post a Comment