Wednesday, October 27, 2010

तुझ्यावीन....मी...

माझ्या कवीता तिला
कधीच कळल्या नाहीत...
त्या कवीतांमागच्या अबोल भावना
तिला कधीच समजल्या नाहीत
आठवायची काय गरज तिला..
ति तर मनात आहे...
तिचे अजरामर स्थान माझ्या प्रत्येक
श्वासात आहे
अजुन कितीकाळ मी माझ्या
मनातले भाव लपवायचे...
माझंही तुझ्यावरं प्रेम आहे
हे अजुन किती दडवायचे..
दोन मनं एकत्र आली तर....
दगडांचीही बाग सजवतील...
त्या मरुदेशात स्वतःचे हक्काचे
नंदनवन सहज फुलवतील.
चंद्र तो मुक साक्षीदार
आपल्या खुळ्या भेटींचा...
त्या हातातींल हातांचा...
त्या केसातील चाफ्याचा.
चंद्र कायमच आसुसलेला..
चांदण्यांसाठी...
त्यालाही कळुदे ना माझं शल्य..
कसा झुरतो मी तुझ्यासाठी
तु....की...मी...
कोण जबाबदार ह्या सगळ्याला....
काय उपयोग आता जाब विचारुन....
उत्तरे शोधुन.......
हातच पोळेल पुन्हा एकदा...
जर मी धरले हातात विस्तवाला...
तिचा मुर्खपणा की शहाणपणा
आता तिनेचं ठरवावं..
माझं काय देणं घेणं तिच्याशी आता...
तिने तिच्या आयुष्याचं काय वाट्टेल ते करुन घ्यावं
माझं आयुष्य माझ्या श्वासांसकट...
अंगण...आपलं त्या बहरलेल्या गुलमोहोरासकट...
ते पिंपळपान....तुझ्या आठवांसकट..
अन माझ्या कवीता...
तुझ्या माझ्या त्या हळव्या नाजुक क्षणांसकट.....
एकटे काहीच नाही...कोणीच नाही...
एकटा तो मी......तुझ्याशिवाय.


ओंकार

1 comment: