Saturday, October 23, 2010

आयुष्य...मन..आणी मी....

ओल्या जखमा कालानुरुपे वाळतात..
दुरावलेली माणसंदेखील जवळ येतात..
पणं मन दुरावली की जवळ येत नाहीत..
नक्की झुकणार कोणासमोर कोण? 
हा प्रश्न कधी मागे पडत नाही...

पाठीवरचे व्रण हे भरुनही येतात..
-हुदयावरचे घाव हे बोचत राहातात..
पाठीवर वार करणारे परकेच असतात..
पण मन तोडुन जाणारे जिवाचे जिवलग असतात

स्पर्धा असते..
मनाशी मनाची..
कोण जिंकतेय कोण हरतेय,,
काहीच देणं घेणं नाहीय तसही मला...

शकुनीच्या पाश्यांप्रमाणे तालावर नाचतायत सोंगट्या...
तो तर पाडायचा घरं त्याच्या मनानुसार ...
आता कोणं वाचवेल द्रौपदीला...
सगळ्यांचीच लाज खुंटीवर टांगलेली

तेंव्हा आला होता कान्हा धावत...आपल्या श्रीसखीसाठी..
आता आपल्यासाठी धावणार कोण?
तो कान्हाही नेसवु शकत नाही वस्त्र आम्हा कोडग्यांना..
इतकी लाज विकुन बसलोय निवांत आपण

आयुष्य म्हणजे सापशिडीचा खेळ..
कधी जायचे हसत शिडीवरुन.
कधी सापाच्या पोटात हरवुन जायचे...
बस.......
आयुष्य जगत राहायचे..
तो शंभर आकडा गाठण्यासाठी

ओंकार

No comments:

Post a Comment