बोलकी असुनही मुकी असते...
सगळे मिळवुनही सारे काही गमावणे असते...
ज्याच्यापायी नकळत आपले मन फसते
बसं नातं हे असेच असते...
उगाच मुठीत घट्ट धरू पाहते......
जणू मृगजळामागे धावत राहते ...
धुक्यात हरवलेली पायवाट असते ...
कधी वाऱ्यावर डोलणारे इवलेसे रानफुल असते ...
कधी डौलदार वटवृक्ष
तर कधी थरथरणारी गवताची पात असते
बसं नातं हे असेच असते...
नाते रातराणीसारखे मुक्यानेच फुलते .....
फांदी फांदी गणिक डोलते ...
तुझ्या केसातल्या मोगाऱ्यावर अलगद मोहरते ...
तरीही मन उगाच उंच का भिरभिरते ...
बसं नातं हे असेच असते...
पहिल्या पावसाची सर असते ...
पहिलाच तेजस्वी किरण असते
पुनवेची चांदणी रात असते...
कधी रात्रीत अलवार चांदण्यात हरवते
बसं नातं हे असेच असते...
--- ओंकार आणि अबोली
No comments:
Post a Comment