Sunday, October 31, 2010

मुखवट्यांआडचा चेहरा...

स्वप्न ही तर मनाचा आरसा.
चेहरा लपवलेला मी...
ह्याच मुखवट्यांच्या जगात..
असाच हरवलेला...ओळख शोधत.
हातांवरच्या रेषा दाखवुन फरक पडेल काय?
नसत्या.....नाटकी जगात वावरुन,
मनःशांती...मिळेल काय?
तुम्हाला काय वाटते...
आहोत जसे आपण...
तसेच मुखवटा..
उतरवुन आपण जगु काय?
सारेच मुखवटे..
कोणी..हसरा....
कोणी दुःखी...
काय जाणे कोणता...
मुखवटा...लावुन मी होईन सुखी?
सगळेच मुखवटे....
खरा चेहरा...
कुठला.....
तोच का?
जो आरश्यासमोर काल कोसळला?
आजवर नेहमीच हेच केलं...
सगळ्यांपायी जगताना...
स्वतःसाठी..जगणंच सोडुन दिलं
अन जेंव्हा ठरवले...
की उतरवुन मुखवटा तिच्यात हरवुन जायचं...
तेंव्हा तिनं एकदिवस...
मलाच सोडुन दिलं....
विदुषकही तसाच...
मुखवटा लावुन माझ्यासारखा..
मनातले सारं लपवणारा..
अन डोळ्यांतले पाणी..पुसुन...
सर्वाना हसवणारा.
मी असाच जगतो..
जे बघतो...
जे भोगतो...
जे ऐकतो...
बस...माझ्या शब्दांत मांडतो...
बस...मी असाच जगतो..


मुखवटा लावुन.....


ओंकार

1 comment: