Thursday, October 7, 2010

चारोळ्यांचे जग..... (Contd.II)

बरसणं माझं तिच्यासाठी..
उमगत नाही ...समजत नाही...
ओघळणारे नुसतं खारं पाणी नसुन प्रेम आहे माझं
कोणालाच का कळत नाही?

प्राक्तनाचा खेळ असतोच हा निराळा 
त्याचा गुढ भावार्थ शेवटच्या श्वासापर्यंत उलगडत नाही
__________________________________________________________________

शब्द मुके होतात तेंव्हा 
पाऊस धिरगंभीर पणे बरसतो...
त्याचा गुढ भावार्थ कधी डोळ्यांत
कधी नभांत सापडतो..
सापडतो अर्थ शब्दांना तेंव्हा
मुक्त झ-यातुन खळखळतो....
तिच्या वेड्या आठवांत रंगुनी
अंगणातील गुलमोहोरावर बहरतो...
मुक्त होऊन कोंदणीतुन आभाळाच्या
तुझ्या मिलनासाठी तारा बनुन कोसळतो...
__________________________________________________________________

मी हसतो म्हणजे मी जगात सर्वात सुखी आहे,,
असे प्रत्येक जण समजत असतो...
माझ्या चेह-यावरचा खोटा मुखवटाच 
जोतो क्षणोक्षणी पाहात असतो,,,
डोळ्यातले पाणी कधीच कोणाला का दिसत नाही..
आणी दिसावे ते कोणाला असे मलाही कधीच वाटत नाही
___________________________________________________________________

प्रयत्न करुन तरी बघ एकदा मनातले कल्लोळ विरुन जातील,,
कोणासाठी तरी ओघळणारे अश्रु देखील सुकुन जातील..

आयुष्य असेच आहे कल्लोळात हरवणारे...
मुक्त पणे हस एकदाच प्रश्नांचे गुंते देखील सुटुन जातील.
___________________________________________________________________

प्रत्येक वादळाला आता सामोरे जायला शिक...
वाहत्या वा-याला आता थोपवायचे शिक...
जीवन हे असाच खेळ आहे सापशिडीचा..
रडीचा डाव सोडुन आयुष्य बिनधास्त जगायला शिक
___________________________________________________________________

अशी भावना जी व्यक्त करुनही अव्यक्तच असते...
बोलकी असुनही मुकी असते...
सगळे मिळवुनही सारे काही गमावणे असते...
ज्याच्यापायी नकळत आपले मन फसते

बसं नातं हे असेच असते...
____________________________________________________________________

नाती सहजच जोडली जातात...
अनेकदा नकळत सहजच तोडलीही जातात
काही नाती मात्र अशी अनाहुतपणे जुळतात
की तुटताना डोळ्यात पाणी ठेऊन जातात

No comments:

Post a Comment