Friday, October 1, 2010

बोलता बोलता...



आरशात स्वतःचाच चेहरा आताशा,
अनोळखी वाटु लागलाय
का जगतोय आणी कोणासाठी,
आता हा प्रश्न पडतोय..
तिच्यासाठी वा तिच्या वेड्या आठवांसाठी...
काहीच कळत नाही
जगण्याचे ध्येय माझ्या,
काही केल्या सापडत नाही
भासांच्या ह्या भोव-यात
खोल खोल गुरफटलोय
ह्या अगतीकतेचा अंत
का गवसत नाही?
अथांग सागराला मनाच्या
सोशीक किनारा सापडत नाही?
आता कळतेय की
क्षितीज कितीतरी दुर होते..
मृगजळाच्या मागे धावत होतो नुसता....
दिशाहीन....ध्येयहीन
काहीच नव्हते
कोणीच नव्हते...
साथ दयायला 
मला समजवायला
बस ह्या जगात जगत होतो निमुटपणे
काटेरी पाऊलवाटा
पायाखाली तुडवत होतो
भळभळती जखम मात्र लपवत होतो
जगापासुन ....
तुझ्यापासुन...
तुझ्या पायाखाली मखमल पसरली
मी मात्र तसाच
जळत्या निखा-यांवरुन चालत
पोळलेले पाय लपवत
चेह-यावर खोट्टं स्मित 
सारं नाटकी........
आता खुप दमलोय....खुप थकलोय...
आता काहीच सुचत नाही 
इतके दिवस ज्याचासाठी धावलो
ते केवळ दिवास्वप्न ठरले
निवांतपणाचे चार क्षण शोधत होतो
आता डोळ्यात खुपतायतं
त्या तुझ्या आठवणी...
अन् तु आणी मी
एकत्र घालवलेले ते भावक्षण
त्या एकत्र जगण्याचा आणाभाका
कापरासारख्या उडुन गेलेल्या...
तुझ्या आठवणींत घुसमटलेला मी
अगतीक असहाय्य
सारे काही अगदी होते तसेच
पुर्वीसारखे
सारे काही जिथल्या तिथेच...
घड्याळाचे काटे कोणीतरी
धरुन ठेवावेत....
आताशा श्वासही गुदमरतो
तुझा विचार करु लागलो की
वाटते संपवुन टाकवे स्वतःला
ह्याक्षणी
ह्या त्रासातुन मुक्त व्हावे कायमचे
अगदी कोणाच्याही नकळत
अनं स्वत:च्याही....
मिटुन जावे
पुन्हा कधीही न उमलण्यासठी...
पण....
पण.... पण कोणासाठी मरायचे?
कोण तू? कुठली तू?
काय दिलेस मला तू आजवर
नात्याच्या नावाखाली डोळ्यात पाणी
ओठांच्या आड दडवलेला
तो हुंदका बस्स....
का रडू तुझ्यासाठी?
आणखी काही तू देउच शकली नसतीस मला....
तुला ते जमलेच नसते कधीच
देण्याचा अर्थ तुला कळलाच नाही कधी
ते समाधान तुला उमजणारच नाही कधी....


:-
अबोली आणी ओंकार

No comments:

Post a Comment