Wednesday, October 27, 2010

महाभारत...कान्हा...अन आत्ताचा मी...(महाभारतावर चारोळ्या..... )

तेंव्हा आला होता
कान्हा धावत...
आपल्या श्रीसखीसाठी..
आता आपल्यासाठी धावणार कोण?
तो कान्हाही नेसवु शकत नाही
वस्त्र आम्हा कोडग्यांना..
इतकी लाज विकुन बसलोय
निवांत आपण

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~

त्याच्या बासरीच्या तालाने....
गोकुळ सारं मोहरुन जायचे...
पण आता ठार बही-या झालेल्या कानांना ऐकु येईल का
त्याच्या पाव्याचा सुर.

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~

ते घडलं त्या श्यामनिळ्याच्या मनाने...
सारं कुरुक्षेत्र... भिजवलं त्यानं..
त्याच पाप्यांच्या रक्तानं...
अनं मगं हळहळला तोही मनातुन...
त्या राधेयाच्या अश्या जाण्यानं

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~

कर्ता करवीता असुनही तो नेहमीच
नामानिराळा राहीला...
त्या निळ्या अंतरीयाच्या आडुन..
कर्णाला खुणावत राहीला

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~

तो नकळत सांगुन गेला..
वेध सारे भवीष्याचे...
पैश्यापायी नीती...नाती...
विसरणा-या माणसाचे..

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~

सारी नाती....सारी गोती..
बाणांमध्ये हरवुन गेली...
कान्हाने रोखायचा प्रयत्न केला..
पण माणुसकी राज्याच्या ओझ्याखाली दबुन गेली

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~

जेंव्हा त्याच्या सहनशीलतेचा बांध फुटला...
तेंव्हा अंगार आकाशातुन कोसळले
हाती रथचक्र घेऊन त्या गांगेयाच्या अंगावर
भगवानही तेंव्हा धावुन गेले

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~

सारं पुन्हा जसंच्या तसं होणार..
पुन्हा एकदा ह्या ह्या भुमीवर धर्माचारण होणार...
"संभवामी युगे युगे"..
लक्षात ठेव...
ह्या इथेच कान्हा पुढचा अवतार घेणार

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~

आपण फक्त कर्म करायचे...
धर्माच्या वाटेवर चालत राहायचे..
गीता आहे दिप मार्ग दाखवणारा..
आपले जिवन उजळुन घ्यायचे

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~

ओंकार

No comments:

Post a Comment