Wednesday, October 20, 2010

काहीसं अस्पष्ठ....... II

आठवणींचे काळे ढग...
अवचीत डोळ्यांतुन बरसतात..
तुझ्या खुळ्या आठवणी आजही डोळ्यात.
उधाणता पुर आणतात
___________________________________________________________
खिडकीबाहेरचा पाऊस
आजही जादु करुन जातो.
विस्मरणातील त्या खोल जखमांना
आजही ताजं करुन जातो..
__________________________________________________________
ओल्या जखमा कालानुरुपे वाळतात..
दुरावलेली माणसंदेखील जवळ येतात..
पणं मन दुरावली की जवळ येत नाहीत..
नक्की झुकणार कोणासमोर कोण? हा प्रश्न कधी मागे पडत नाही.
__________________________________________________________
पाठीवरचे व्रण हे भरुनही येतात..
-हुदयावरचे घाव हे बोचत राहातात..
पाठीवर वार करणारे परकेच असतात..
पण मन तोडुन जाणारे जिवाचे जिवलग असतात
__________________________________________________________
स्पर्धा असते..
मनाशी मनाची..
कोण जिंकतेय कोण हरतेय,,
काहीच देणं घेणं नाहीय तसही मला..
__________________________________________________________
शकुनीच्या पाश्यांप्रमाणे तालावर नाचतायत सोंगट्या...
तो तर पाडायचा घरं त्याच्या मनानुसार ...
आता कोणं वाचवेल द्रौपदीला...
सगळ्यांचीच लाज खुंटीवर टांगलेली
__________________________________________________________
तेंव्हा आला होता कान्हा धावत...आपल्या श्रीसखीसाठी..
आता आपल्यासाठी धावणार कोण?
तो कान्हाही नेसवु शकत नाही वस्त्र आम्हा कोडग्यांना..
इतकी लाज विकुन बसलोय निवांत आपण
__________________________________________________________
आयुष्य म्हणजे सापशिडीचा खेळ..
कधी जायचे हसत शिडीवरुन.
कधी सापाच्या पोटात हरवुन जायचे...
बस.......
आयुष्य जगत राहायचे..
तो शंभर आकडा गाठण्यासाठी
__________________________________________________________

ओंकार

No comments:

Post a Comment