Thursday, October 7, 2010

चारोळ्यांचे जग..... (Contd.)

माझ्या कवीता विचारतील हिसाब
डोळ्यातुन आज ओघळलेल्या आसवांचा...
आज आहे उद्या नसेन मी
कधी न उमगला खेळ हा नशीबाचा....
त्या आसवांची किंमत मोजताना
तुला कदाचीत तुझी चुक उमगेल
बघ मागे वळुन फक्त एकदा सखे...
तुझ्या पाऊलांशेजारी उमटालेले माझेही पाऊल दिसेल
____________________________________________________________________

मी लिहीलेले वाचायला उद्या मी असेन नसेन कुणास ठाऊक..
निदान लिही पर्यंत तरी श्वास देतील का श्वास देवास ठाऊक
उद्या मी नसलो तरी माझ्या कवीता तुझ्याशी बोलक्या होतील...
माझ्या पाठी माझ्या आठवणी सखे तुझ्याकडे घाव घेतील
____________________________________________________________________

आता नक्की कशाला सावरु काहीच कळत नाही
बिथरलेलं मनं की पसरलेली स्वप्ने...
काहीच समजत नाही...

दोन्ही तितकीच महत्वाची

जगण्यासाठी......
____________________________________________________________________
आकाशातील ता-याचे प्राक्तन
कोसळणेच होते...
तुझ्या माझ्या मिलनाचे सारे संकेत
ठळकच होते.
पण कदाचीत माझ्या स्वप्नांचा पाया
हा वाळुचाच निघाला....
एका उसळलेल्या लाटेसरशी
माझ्या कल्पनांचा महाल कोलमडुन गेला
____________________________________________________________________
कोलमडताना त्या महालाच्या भिंती
आजही तुझ्या वाटेकडे पाहात होत्या...
सावरायला स्वतःला आजही
तुझ्या हातांना शोधत होत्या...
सारे संकेत... सारे काही
सरतेशेवटी पुसट झाले...
दुस-या लाटेच्या आघाताने
उरलेले ते भग्नावशेष पसरुन गेले
____________________________________________________________________

त्याचा अर्थ शोधता शोधता...
जन्म पुरा सरुन जातो...
आसवांना जाब पुसता पुसता....

पुन्हा तुझ्या आठवांत मी हरवुन जातो..
____________________________________________________________________

वेड्यागत वावरतोय आजही तुझ्याचसाठी....
तिळतिळ करुन आजही तुटतोय मी
केवळ तुझ्या सुखासाठी..
बेभान वा-यालाही आज मी वचनात बांधुन ठेवले...
पण तरीही डोळ्यांचे पाश तोडुन सारे..
पापण्यांवरुन दोन थेंब हलकेच ओघळले

No comments:

Post a Comment