Thursday, October 7, 2010

चारोळ्यांचे जग..... (Contd. III)

असे म्हणतात की आरसा कधी खोटं बोलत नाही
तुटतेय माझे मन आत हे त्याला कसं कळत नाही
डोळ्यांतील अश्रु आता पापण्यांचा आड दडवलेत...
वाट तुझी पाहुन आता डोळेही माझे थकलेत
____________________________________________________________________

आरशात स्वतःचाच चेहरा आताशा,
अनोळखी वाटु लागलाय
का जगतोय आणी कोणासाठी,
हा प्रश्न आता पडु लागलाय
तिच्यासाठी वा तिच्या वेड्या आठवांसाठी...
काहीच कळत नाही
जगण्याचे ध्येय माझ्या,
काही केल्या सापडत नाही
____________________________________________________________________

बनुनी बिजागर जुनाट कुरकुरतो पाऊस
लावुन पंख गरुडाचे आकाशी विहरतो पाऊस
तुला नी मला भेटवतो तो हाच पाऊस
आहे रोजचाच तरी आहे वेगळा पाऊस
____________________________________________________________________

आज कोसळे पाऊस
कुठे ढगांत कुठे डोळ्यांत
बनुनी प्रेम माझे आज पाझरे पाऊस
आहे रोजचाच तरी वाटे वेगळा पाऊस
____________________________________________________________________

आठवांनी तिच्या झाला चिंब तो पाऊस
आर्त साद बनुनी आज घुमतो पाऊस
तिच्या कानी जाऊन अलगद कुजबुजतो पाऊस....
आहे रोजचाच तरी आहे वेगळा पाऊस

____________________________________________________________________

स्वप्नांतुन सत्यात उतरताना तुझी पाऊले हळुवार वाजतात
माझ्या -हुदयाचा एक ठोका त्या नेहमीच चुकवतात
चेह-यावर आलेली बट तु अलगद बोटांनी सावरतेस...
ओठांनी काहीच बोलत नाहीस पण डोळ्यांनी घायाळ करुन जातेस
____________________________________________________________________

प्रेम म्हणजे ति समोर नसतानाही
जवळ असल्याचा भास...
प्रेम म्हणजे जणु असतो
एक सुंदर आभास
____________________________________________________________________
डोळ्यांत घेऊन स्वप्ने
जागेपणी वावरणे म्हणजे प्रेम
त्याच स्वप्नांच्या जगात
मुक्तपणे वावरणे म्हणजे प्रेम
____________________________________________________________________
प्रेम म्हणजे लुटणे नाही
प्रेम म्हणजे लुटवणे....
डोळ्यांत पाणी असतानाही
तिच्यापासुन अवचीत लपवणे
____________________________________________________________________
प्रेम म्हणजे काळजी...
प्रेम म्हणजे विश्वास
प्रेम म्हणजे -हुदयाचा ठोका...
प्रेम म्हणजेच श्वास

1 comment:

  1. पाऊस - छान जमलाय पाऊस मस्त पैकी लयबद्ध आनी उपमाही सुंदर आहेत....
    आरसा कधी खोटं बोलत नाही - सुद्धा आवडली..
    शेवटी
    प्रेम म्हणजे - प्रेम म्हणजे प्रेम असत (पण सर्वांच सेम नसत?)

    शिवचंद्र .....

    ReplyDelete