Sunday, December 28, 2008

चारोळ्यांचे जग.....पुन्हा एकदा


तुझी चाहुल लागताच
मन माझं पिसं होतं
सारं क्षणांत विसरुन जातं
अनं ते फक्त तुझंच होतं

सा-या वातावरणात
कशी भरलेली एक अनोखी धुंदी
भर चांदण्यात न्हात
जशी रंगावी जुगलबंदी

तुझा चेहरा पाहाताच
तो नभीचा चंद्र्मा देखील लाजला
मेघांची काळीमा ओढुन चेह-यावर
बहुतेक कुठेसा जाऊन लपला

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
असेल सखे तुझीच साथ
साधारणश्या क्षणांमध्येही
तेंव्हा असेल काही विशेष बात

तुझं माझ्या सोबत असणंच
मनाला एक उभारी देतं
संकटांना सामोरे जाण्याचं
तेच मला बळ देतं

नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)

अर्धांगी




ति तुच होतीस का गं?
अंगात हिरवा शालु नेसुन,
हातांत हिरवा चुडा,
केसांत माळलेला गजरा,
अन भांगातलं सौभाग्यलेणं
होय तिच तु...
माझ्या स्वप्नांत दिसणारी,
तु... माझं बेरंग आयुष्यात रंग भरणारी,
तु... आयुष्याला नवं ध्येय देणारी,
थोडीशी लाजरी बुजरी,
माझी "गोंडसपरी"
बोल होशील माझी माझी “अर्धांगी”?
लावशील कुंकु माझ्या नावाचं?
जगशील माझ्यासाठी,
अगदी माझीच बनुन?
बस...
अन मी तुझाच...
प्रत्येक जन्मासाठी....

सप्तपदीची सात पाऊले
वचने देखील सात
संकटे सारी जातील विरुन
जर हातात असेल तुझा हात


नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)

हुंदका


जात होतीस क्षणाक्षणाने दुर
तोडत होतीस आपल्यातले बंध
नातं तर कधीच तोडलं होतं
पण मैत्री ?
मैत्री तर अमर असते ना?
मग इथं? का हा परकेपणा?
का मरतोय आपण क्षणाक्षणाने?
का तुटतोय आपण कणांकणांने?
माझा कशालाही विरोध नव्हता....
कशालाही....
पण कुठेतरी मनाला बोचत होता तुझा तो विरह...
तु नसशील आता माझ्यासोबत
काही दिवस... काही महीने... का काही जन्म..
सांग जगु शकली असतीस माझ्याशिवाय?
करु शकली असतीस मला वजा आयुष्यातुन ?
सांग? नाही ना?
मग का हा अट्टहास?
डोळ्यांत पाणी दोघांच्याही
ओठांतुन शब्दच फुटत नव्हते....
तितक्यात तु दिलेलं “उत्तर”
माझ्या एका अनुत्तरीत प्रश्नाचं....
त्या क्षणी मला वाटले की
आता सारं संपलं
आता माझी "वेडाबाई" माझी कधीच होणार नाही
अन माझा उर अचानक भरुन आला
अन तुला ऐकु आला माझा "हुंदका"
अगदी पुसटसा.....

नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)

प्रश्न


माझे शब्द, माझ्या कवीता
माझा चेहरा, माझी ओळख
दिवसेंदिवस धुसर अन अस्पष्ठ
आहेत त्या जुन्या आठवणी
त्या जुन्या वहीची पाने
त्यात ठेवलेले एक मोरपीस
एक गुलाब आणी एक जाळीचं पिंपळपान
वाटतं फेकुन द्यावं सारं
का? कोणासाठी?
अजुन कितीवेळ?
कवी .... कवीता... का?
प्रेमकवीता... विरहकवीता...
अजुन काय काय लिहायचे ?
एखाद अप्रतीम काव्य लिहीले?
का अजुन शब्दच सापडले नाहीत?
काय मिळालं काय गमावलं ह्याचा मांडलेला हिशोब..
का गुंतलेय मन अजुन त्या जिर्ण पानांत?
का दाटतेय पाणी पुन्हा पुन्हा डोळ्यांत?
कसला हा बंध? बंध का बंधन?
सारं कसं अकल्पीत अनाहुत,
अन जगण्याचं हरवलेलं ध्येय...
का?

नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)

Friday, December 26, 2008

वचन


कधी वाटले तुला रडावे मनसोक्त
हक्काने तु माझ्याशी बोल
मी "वचन" देतो तुला की
जरी त्या क्षणी तुला नाही हसवले
तरी मीही रडेन तुझ्यासोबत अगदी तसाच
अगदी तसाच......

कधी वाटले तुला की दुर जावे
हक्काने ते मला सांग
मी "वचन" देतो तुला की
तुला थांब असे नाही म्हणणार
कारण तुझा हात हातात घेउन मी ही धावणार
अगदी तुझ्यासोबत......

वाटले तुला की ऐकु नये कोणाचेही
फक्त एकदा माझ्याशी बोल
मी "वचन" देतो तुला की
असेन अगदी असाच
शांत पणे वाट पाहात
अगदी आत्तासारखाच....

अन जर कधी तु मला साद दिलीस
अन मी प्रतीसाद नाही दिला
तर तु देशील एक "वचन"
येशील अगदी धावत माझ्यासाठी
त्या क्षणी माझ्यासोबत इतर कोणीही नसेल
अन मला फक्त तुझीच गरज असेल

नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)