Saturday, January 16, 2010

शेवटची इच्छा ( I Quit)


आजवर केवळा मुर्खासारखाच वागलो
कसलाच विचार केला नाही
की कदाचीत तुही सोडुन जाशील मला
असा विचारच मनात आला नाही
माहीत होते की
तु असशील कायम माझ्यासोबत
कधीच सोडुन जाणार नाहीस
पण नियतीने असे का केले ?
का माझे वादळातुन सावरलेलं घरटं
असं एका फटक्यात उध्वस्थ केलं?
काय वाईट केलं होतं मी कोणाचे?
ज्याची एवढी मोठी शिक्षा दिलीय मला
तु नसशील आता माझ्यासोबत
माझे कौतुक करायला
माझी पाठराखण करायला
मला जगण्याचे ध्येय दाखवायला
माझ्यासोबत हसायला रडायला....
सांग ना कोणाकडे सांगु की
आता मला कसं वाटतेय
कोणीच नाहीय इथे
पार एकटा पडलोय
पण जाता जाता तु मला वचनात बांधुन गेलीस
हरणार नाही रडणार नाही
असे वचन घेउन गेलीस
आता कोणासाठी जगु कशासाठी कोणीच नाहीय
माझं हक्काचं
बाकी काहीच करु नकोस
परत ही येऊ नकोस
माझी शेवटची इच्छा आहे पुर्ण करशील?
माझं मरण तुझ्या जवळ यावं
कदाचीत तुझ्या मिठीत यावं
बोल् देतेस वचन इतकेच
बाकी काहीच नाही

भेटशील ?


फक्त एकदाच भेटायचे आहे
मला तुला तुझ्या मिठीत शिरुन ओक्साबोक्षी रडायचे आहे
“परी” खुप प्रेम केले होते
तुझ्यावर नि कायमच करत राहीन
माहीतीय मी ही वागलो
अगदी मुर्खासारखाच
पण त्यासाठी इतकी मोठी शिक्षा दिली नियतीने
त्या माझ्या भांडणांमागे
तुझा राग नव्हता ग वेडे
होते ते प्रेम फक्त निखळ प्रेम
बाकी काहीच नको होते मला
हवा होता तो एकांत
फक्त काही क्षणांसाठीचा
पण नाही यार
सगळे सुरळीत होईल असे वाटत असतानाच
नेमकी तु सोडुन दिलीस माझी साथ
मान्य आहे की
तुझा ही नाईलाज झाला होता
पण निदान वेळ तरी बघायची होतीस
विचारले तर बोलतेस
“येऊ पुढल्या जन्मी एकत्र”
येऊ कि नाही देवास ठाऊक
पण एकच बोलु म ना पसुन
भेट ना गं मला एकदाच
माझी तिच वेडी प्रेयसी बनुन
रडुदे मला….. पुर्ण मोकळे होऊदे
बाकी काहीच बोलणार नाही
बोल न भेटशील ?
अगदी तशीच ?

प्रेम बिम सारं झुठ


प्रेम बिम सारं झुठ
खरे खुरं काही नसतं
दुरवर असलेल कोणीतरी
उगाच आपल्याला जवळ दिसतं
म्रुगजळाच्यासारखं ते सारं फसवं असतं
भले चांगलं माणुस ह्या प्रेमात पडुन फसतं

एक शेर अर्ज फर्मा रहा हुं गालीब थोडा गौर किजीए
पसंद आ जाये तो बस एक बार मुस्कुरा दिजीये
पथ्तरोंसे प्यार न कर गालीब
पथ्तरोंसे प्यार न कर गालीब
पथ्तर कभी पिघलते नही
तु लाख कोशीश करले पागल
मुर्झायें हुए फुल फिरसे खिलते नही
असंच फसवं प्रेम बिम सारं कसं झुठ असतं
वाटतं दुरुन साजरं तरी जवळुन फक्त जळता निखारा असतं
हातत घेउन भघावा तर त्याने आपण हात आपले पोळतो
आणी दुर् गेल्यावर ते आपल्यापासुन फक्त आपण कोसळतो

देशील उत्तर.?


कित्तेकदा सांगायचा प्रयत्न केला तुला
पण कधी सांगुच शकलो नाही
वेडे किती प्रेम केलं तुझ्यावर ह्याची तुला जाणीव करुनच देवु शकलो नाही
होत राहीलो कायम व्याकुळ तुझ्या काळजीने
पण तुझ्यासमोर तरी हसत होतो
दुखः माझे लपवताना एकांतात एकटाच रडत होतो
बाळगले होते स्वप्न उराशी की असशील कायम सोबत
एकवेळ सावलीही सोडेल माझी साथ पण तु असशील कायम
पण नियतीला तेही मान्य नव्हते कदाचीत
नेले हिरावुन तुलाही माझ्यापासुन
अन तुही
जाता जाता मला शब्दात बांधुन गेलीस
रडणार नाही….. हरणार नाही…..
दे वचन मला असे बोलुन गेलीस
आता जगण्याला माझ्या अर्थच उरला नाही
कोणासाठी जगायचं,
श्वासांसाठी की प्राणासाठी
पण खरे सांगु माझ्या शरीरातला प्राणच वेडे तु होतीस
कधीच विचारच केला नाही कि
तु जाशील सोडुन मला अशी अनाहुतपणे
पण शेवटी तु गेलीसच....
मनात कायम तुच असशील पण
जेंव्हा डोळ्यात पाणी दाटेल तेंव्हा मला
"ए मनु असा का रडतोस" कोण विचारेल?
भांडताना "आम्ही नाही बोलत जा तुमच्याशी आम्ही कट्टी" कोण बोलेल?
माझ्याशी लटके लटके कोण भांडेल
सांग ना देशील उत्तर..
खुप विचार केला पण काहीच सापडले नाही
वेडे तुझ्यापासुनच माझे आयुष्य सुरु झालेले
अन तुझ्यापाशीच संपायचे त्यापलीकडे काहीच नव्हते
मझ्या विश्वाचे क्षितीज वेडे तुझ्यापाशीच संपत होते
त्या पलीकडे जाण्याची इच्छाच नव्हती
पण...
जाऊदे उगाच काहीतरी…..

नेहमीच तुमचाच

ओंकार(ओम)

झिजलेल्या पायवाटेवर


आजवर केवळ हरतच आलोय
जिंकायची सवयच गेली होती
येणारा दिवस जगत होतो जगत कसला कुंठत होतो
रडत विव्हळत कोणालाच पर्वा नव्हती
आणी अश्या शुद्र जिवाची कोण पर्वा करेल...
पर्वा करण्यासारखं केलय तरी काय?
मी होतो शुन्य कसलीच किंमत नसलेला
जगण्याचे ध्येय हरलेला
बसलो होतो त्या नेहमीच्याच
जगाच्या झिजलेल्या पायवाटेवर
कोणातरी पांथस्थाची वाट बघत
कधी येईल?
काहीच माहीत नव्हते पण येईल मात्र नक्की...
बस... त्याच वेड्या आशेवर जगत होतो
तुझ्या येण्याची वाट बघत
जाणवलेच नाही की कधी तु माझ्या आयुष्यात आलीस
अन माझ्या सोबत चालता चालता
माझे जगण्याचे ध्येच बनुच गेलीस
सारं काही विसरलो होतो,
तुझ्या सोबतीने चालता चालता
आता कोणाचीही पर्वा नव्हती
कोणाचीही भिती नव्हती
मनत विश्वास होता की तु असशील कायम
आयुष्यभरासाठीच
सारी पाने एक एक करुन गळुन जातील
पण तु अन मी कधीच नाही
पण नियतीला ते ही मान्य नव्हते कदाचीत
नेले त्याने तुला हळुच दुर माझ्यापासुन
माझा आजवरचा हक्काचा आधारच आज हिरावला होता
मला पुन्हा एकदा हरवण्यासाठी
नियतीने हा क्रुर खेळ मांडला होता
आता पुन्हा एकदा एकटा पडलोय मी
एकटाच चालतोय....
पुन्हा त्याच
जगाच्या झिजलेल्या पायवाटेवर