Saturday, January 16, 2010

झिजलेल्या पायवाटेवर


आजवर केवळ हरतच आलोय
जिंकायची सवयच गेली होती
येणारा दिवस जगत होतो जगत कसला कुंठत होतो
रडत विव्हळत कोणालाच पर्वा नव्हती
आणी अश्या शुद्र जिवाची कोण पर्वा करेल...
पर्वा करण्यासारखं केलय तरी काय?
मी होतो शुन्य कसलीच किंमत नसलेला
जगण्याचे ध्येय हरलेला
बसलो होतो त्या नेहमीच्याच
जगाच्या झिजलेल्या पायवाटेवर
कोणातरी पांथस्थाची वाट बघत
कधी येईल?
काहीच माहीत नव्हते पण येईल मात्र नक्की...
बस... त्याच वेड्या आशेवर जगत होतो
तुझ्या येण्याची वाट बघत
जाणवलेच नाही की कधी तु माझ्या आयुष्यात आलीस
अन माझ्या सोबत चालता चालता
माझे जगण्याचे ध्येच बनुच गेलीस
सारं काही विसरलो होतो,
तुझ्या सोबतीने चालता चालता
आता कोणाचीही पर्वा नव्हती
कोणाचीही भिती नव्हती
मनत विश्वास होता की तु असशील कायम
आयुष्यभरासाठीच
सारी पाने एक एक करुन गळुन जातील
पण तु अन मी कधीच नाही
पण नियतीला ते ही मान्य नव्हते कदाचीत
नेले त्याने तुला हळुच दुर माझ्यापासुन
माझा आजवरचा हक्काचा आधारच आज हिरावला होता
मला पुन्हा एकदा हरवण्यासाठी
नियतीने हा क्रुर खेळ मांडला होता
आता पुन्हा एकदा एकटा पडलोय मी
एकटाच चालतोय....
पुन्हा त्याच
जगाच्या झिजलेल्या पायवाटेवर

No comments:

Post a Comment