Friday, January 1, 2010

दोन अश्रु


आज कितीतरी दिवसात पाहीले तुला,
सारं कसं भकासं झालं होते आयुष्य माझे...
तुझ्या त्या अश्या अचानक निघुन जाण्याने
निदान जाण्याआधी एकदा बोलायच तरी होतेस,
पण तु गेलीस निघुन अगदी वादळासारखीच
अन मी.. तसाच गुदमरत.... तडफ़डत ,
प्राक्तनालाच दोष देत...
अडकलेला गुंतलेला....
त्या भिंतीवरच्या कोळीष्ठकात एखादा निष्पाप जिव हकनाक फसतो,
न अगदी तसाच
तसाच त्या जुन्या आवणींमध्ये अडकलेला
बस....
त्यातुन सुटणे अशक्यच...
इतके सारं असुनही नेहमीच हसत होतो
ह्या दुनीये समोर, तुझ्यासमोर….
कधी तुला जानवुच दिले नाही की तुझ्या अश्या अनहुत जाण्याने व्यथित झालोय
वागत होतो षंढासारखा
इतके दिवस मी अश्रुंना बाधुन टाकले होते
त्या पाणावलेल्या डोळ्यांच्या कडांपाठी....
पण आज तु दिसलीस
अन त्या सर्व अश्रुंचे बांधलेले पाट
सारे अचानक तुटले
व सारे नियम, सारे बंध सारी बंधने तोडुन
दोन अश्रु अगदी अनाहुत पणे तिथुन निसटलेच

No comments:

Post a Comment