Saturday, January 16, 2010

जियो अनलिमिटेड.....


नेहमीच झुगारत आलोय आजवर
ह्या समाजाची बंधने का
पाळायची सांगा ना
काय दिलेय आजवर समाजाने
कायम डोळ्यात पाणी...
शिव्यांची लाखोली
अन नेहमीचेच रडगाणे
तेही झिजलेय आता यार कोणीतरी चेंज करा
कोणीतरी सांगा की काळ बदलतोय
मी समाजाच्या विरुध्द म्हणुन
आजवर केवळ मुर्ख ठरत आलो
रडलो, चिडलो, ओरडलो, किंकाळलो
पण कोणालाच काही फरक पडत नाही
अरे इतके का सगळेच बहीरे झालात
की तुम्हाला आवाजच ऐकु येत नाही
मला वेडा बोललाय
याद राखा
मी बंधने झुगारली म्हणुन वेडा बरोबर न
मान्य करतो आहे मी वेडा
जर तुमच्यासारखे षंढ आत्मे शहाणे असतील
तर मी वेडाच बरा
निदान आम्हा वेड्यांच्या कल्प्नांना
तुमच्या त्या तुटक्या फ़ुटक्या नितीमुल्यांची बंधने नसतात
कोणताही विचार नसतो
जियो अनलिमिटेड बस.....
जगायचे तुमच्या त्या गर्दीतुन दुर
कुठल्याश्या अंधा-या खोलीत
अन मग स्वतः अंधारत हरवुन घ्यायचे बसं.....

1 comment:

  1. mitra chan kavita lihilis, vidrohi, i really like this one!

    ReplyDelete