Saturday, January 16, 2010
देशील उत्तर.?
कित्तेकदा सांगायचा प्रयत्न केला तुला
पण कधी सांगुच शकलो नाही
वेडे किती प्रेम केलं तुझ्यावर ह्याची तुला जाणीव करुनच देवु शकलो नाही
होत राहीलो कायम व्याकुळ तुझ्या काळजीने
पण तुझ्यासमोर तरी हसत होतो
दुखः माझे लपवताना एकांतात एकटाच रडत होतो
बाळगले होते स्वप्न उराशी की असशील कायम सोबत
एकवेळ सावलीही सोडेल माझी साथ पण तु असशील कायम
पण नियतीला तेही मान्य नव्हते कदाचीत
नेले हिरावुन तुलाही माझ्यापासुन
अन तुही
जाता जाता मला शब्दात बांधुन गेलीस
रडणार नाही….. हरणार नाही…..
दे वचन मला असे बोलुन गेलीस
आता जगण्याला माझ्या अर्थच उरला नाही
कोणासाठी जगायचं,
श्वासांसाठी की प्राणासाठी
पण खरे सांगु माझ्या शरीरातला प्राणच वेडे तु होतीस
कधीच विचारच केला नाही कि
तु जाशील सोडुन मला अशी अनाहुतपणे
पण शेवटी तु गेलीसच....
मनात कायम तुच असशील पण
जेंव्हा डोळ्यात पाणी दाटेल तेंव्हा मला
"ए मनु असा का रडतोस" कोण विचारेल?
भांडताना "आम्ही नाही बोलत जा तुमच्याशी आम्ही कट्टी" कोण बोलेल?
माझ्याशी लटके लटके कोण भांडेल
सांग ना देशील उत्तर..
खुप विचार केला पण काहीच सापडले नाही
वेडे तुझ्यापासुनच माझे आयुष्य सुरु झालेले
अन तुझ्यापाशीच संपायचे त्यापलीकडे काहीच नव्हते
मझ्या विश्वाचे क्षितीज वेडे तुझ्यापाशीच संपत होते
त्या पलीकडे जाण्याची इच्छाच नव्हती
पण...
जाऊदे उगाच काहीतरी…..
नेहमीच तुमचाच
ओंकार(ओम)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment