Monday, February 28, 2011

नेहमीच प्रश्न

आता....बरेच काही साचलेलं..
मनातलं...बोलुन मोकळं...व्हायचयं..
त्या पाण्यातले तरंगच काय...
पाणीच आता स्वतःची
ओळख हरवुन बसलेय...
बोलुन व्यक्त करुन...काही मिळेल..
काही नाही...ह्याचा
विचार करणेच सोडुन दिलेयं..
मिळेल...ती शांती...निदान
व्यक्त करुन टाकल्याची..
पण त्या नंतरही नाही सापडणार...
ती उत्तरे ...
त्यामुळे उभ्या राहीलेल्या प्रश्नांची....
प्रश्नांपासुन पाठ सोडवता सोडवता...
पुन्हा प्रश्नांतच गुंतलेला मी...
अन उत्तरे....नदीच्या त्या पैलतीरावर....
चिडवुन दाखवणारी...
रोज नवीन प्रश्न...अन रोज नवा अट्टहास...
उत्तरे शोधण्याचा
की जगण्याचा....
बघा...पुन्हा नवा प्रश्नच..
कधीकधी...आयुष्य...हे...
नकळत..प्रश्नांचा..कारखाना वाटते....
कित्तेक प्रश्न...येतात....
रोज नवीन रुपे लेवुन...
अन मी मात्र तसाच..
धीरगंभीर....उत्तरे शोधण्यात हरवलेला...
जाऊदे आता पुरे करावं...
हेच नेहमीच प्रश्न पुराण...
त्याचा..आदी न अंत...
कदाचीत...शेवटच्या श्वासांबरोबर सरतील ते....

कदाचित....

ओंकार

काहीच न बोलता...

सारचं...आलबेल...
वाटलं...होतं....
आलेलं...वादळ निघुन गेलं...
पणं....
आता डोळ्यासमोर दिसतात...
त्या वादळात
अस्तित्व हरवलेल्या वाटा....
काही मोडकी झाडं..
अन चिमणा-चिमणीचा मोडका संसार....
एका क्षणांत इतकं...
काही बदलेल....
कधीचं वाटलं..नव्हत....
त्या वाट चुकलेल्या पांथीकाने...
पटकनं विचारलं...
ह्या वादळात तुझं काय गेलं...
मी इतकेच बोललो....
ह्या दगडाला....त्या वादळानं...
फक्त मुकं केलं.....
सारं काही सोसायला....
बघायला....
काहीच न बोलता...


ओंकार

Saturday, February 26, 2011

सारेच वेडे....

शहाण्यांच्या दुनीयेत
सारेच वेडे....
अनोळखी गर्दीतही
सापडतात ओळखीचे थोडे...
काहींना मिळतो
प्रतीसाद सादेला...
काहींच्या नशीबी मात्र
केवळ नकाराचे धडे
नशीबाच्या रेषा
एकमेकांत गुंतलेल्या...
वाकड्या तिकड्या वळणांत
अस्तित्व हरवलेल्या...
काहीश्या बोलक्या खुणा
त्यांनी दिलेल्या..
काहींच्या मुळाशी ....
नकोसा...
अबोला सांडलेला...

ओंकार


बेरंगी दुनीया...

मनातले सारं
सत्यात उतरवायला
एक क्षण देखील

लागणार नाही...
पण ते सारं

सत्यात उतरल्यावर....
माझ्या स्वप्नांत 

काहीच राहणार नाही...
सुर तुझे माझे
स्वप्नातले....
असेच ....

बरेच काही जुळवणारे...
नकळत जवळ आणणारे...
अचानक दुर नेणारे

दोन बोटांमधली पोकळी...
तु तुझ्या अस्तित्वाने

भरुन टाकलीस....
माझ्या आयुष्याची

बेरंगी दुनीया....
तु सप्तरंगी

बनवुन टाकलीस...

ओंकार

तु बोलतेस..

तु उगाच काहीही बोलतेस..
पण शब्द तुला साथ देतात...
तु उगाच काहीही बोलतेस..
पण शब्द तुला साथ देतात...
तु नको नको बोलतेस...
पण शब्द दाद घेऊन जातात

आजकाल तुझं ते नेहमीचं बोलणं
देखील बरेच काव्यात्मक

वाटायला लागलयं...
काय माहीत कसं ते
पण न बोलताच बरेच काही

कळायला लागलयं

ओंकार