Monday, February 8, 2010

सुर पाव्याचे


अंधारलेलं आभाळ अनं डोळ्यात पाणी बस …..
तिच नेहमीची ओळखीची वाट
अन तोच ओळखीचा मी
कानी पडणारे ते पाव्याचे अखंड सुर
कोण छेडतंय हे शोधण्याचा
कित्तेकदा असफ़ल प्रयत्न करुन पाहीलाय मी
पण आजवर कोणीच सापडले नाही
कोण असेल तो?
कदाचित
कोणा वेडीचा वेडा प्रियकर, जो
देत असेल अशी आर्द साद
आपल्या प्रेयसीला,
खुणावत असेल की मी आलोय….
आलोय ग ; तुही ये ना
धावत... समाजाची बंधने झुगारत…
धपापत्या उराने ये
अशीच येउन बिलग मला….
काहीही विचार करु नकोस
की असेल एखादा….. आशीक
जो त्या पाव्यात विसरुन जात असेल
त्याच्या असफ़ल प्रेमाची कहाणी
त्या वेडीच्या आठवांपासुन दुर जाण्याचा
प्रयत्न करीत असेल….
तिच्यासाठी झुरत असेल…..
खरंच…. खरे काय ते तोच जाणे ….


Contd.....

.


पण आज…..
आज त्याच्या सुरांत वेगळाच दर्द होता
देव जाणे काय झाले होते ?
मी पुन्हा शोधण्याचा प्रयत्न केला
निघालो त्या नादाच्या दिशेने
पाउले झपाझप टाकत
अचानक तो सुर छेडणे बंद केले त्याने
सारा नुर पालटला होता
का बंद केलं त्याने?
समजतचं नव्हते
शेवटी तो जिथे बसला होता….. तिथे पोहोचलोच
तोच नदीचा काठ अन
तोच काळाकभिन्न दगड
त्यावर एक कागद ठेवला होता
अन त्यावर त्याची बासरी
तो कुठेच दिसत नव्हता आसपास
मी कागद उचलत ती बासरी सावरुन ठेवली
कागद हातात घेउन वाचु लागलो
जास्त काही लिहीले नव्हते
बस.. इतकेच की
जन्मोजन्मी साथ देण्याची वचने घेऊन
आपण सात फेरे घेतले
पण तु माझी साथ सोडलीस
आजवर केवळ तुला आवडायचे
म्हणुन इथे बसुन पावा वाजवायचो
केवळ …..केवळ वेड्या आशेवर की
तु कुठुन तरी ऐकत असशील
त्याच काठावर,
जिथे तु नेहमीच मला भेटायचीस
मला बिलगुन तासंतास,
माझ्या पाव्याच्या नादात
सर्व भान विसरुन गुंग होउन जायचीस
पण आता…..
तुझ्याशिवाय जगणे अशक्य झालेय
तेंव्हा येतोय मी
तुला भेटण्यासाठी...


Contd.....

.


त्याने तिच्यासाठी देह त्यागला
खरचं असे असते का प्रेम?
कोणी इतकं प्रेम कसे करु शकतं एखाद्यावर?
प्रेम म्हणजे नक्की काय?
कोणालाच माहीत नाही
का कोणासाठी जन्म मरणातली ही रेषा देखील पुसट होते,
का कोणी प्रेमापायी इतकं वेडं होतं !!
काय असते हे प्रेम....
आजवर केवळ ऐकुन होतो
सगळं आभाळ भरुन आलं अचानक
व पावसाचे थेंब कोसळु लागले
जणु त्या वेड्याच्या अश्या जाण्याने
त्या आभाळाचंही मन भरुन आले
तिच तर त्या “वेड्या आशिकाला” सलामी होती
तो कोणाचा कोण होता ? ती कोण होती?
काहीच माहीत नव्हते मला
पण का ?
पण का? त्याच्यासाठी आज माझे डोळे भरुन आले?
कोण लागत होता तो माझा ?…..


Contd.....

.


धोधो कोसळुन तो पाऊस आता थांबला होता
निघालो मग तिथून
सोबत होता तो भिजलेला कागद,
अन हातात गच्च धरलेली त्याची ति बासरी
डोक्यातुन त्याचा विचार
काही केल्या जात नव्हता
कसा दिसत असेल तो?
अन ती... जिच्यावर…
जिच्यावर तो जिवापेक्षा जास्त प्रेम करायचा
किती उच्च पातळीवर नेलं त्यांनी प्रेमाला
जन्म मरणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी प्रेम केलं
खरेचं असं प्रेम... बस...
डोळ्यांत अजुनही
त्याच्या त्या कागदावरील मजकुर नाचत होता
अन कानांत
तोच तो पाव्याचा ओळखीचा सुर....
तसाच घरी आलो
रात्रभर शेजारचा दिवा मालवण्याची
हिंमतच झाली नाही.....
नजर अजुनही त्या कागदावरुन हलत नव्हती
तो वेडा कधीच निघुन गेला …
पण जाताना
तो अजुन एका वेड्याला जन्म देउन गेला
काय झाले असेल त्यांचे पुढे?
खरेच भेटले असतील का ते?
की त्याचे मरण वाया गेले...
खरं सांगु….
त्यांचे मिलन व्हावे हिच इच्छा मनात होती
ह्या जन्मी नाही तर निदान पुढल्या जन्मी
त्यांच्यासाठी प्रार्थना करता करता
डोळा कधी लागला कळलेच नाही….

Contd.....

.


आज ब-याच दिवसांनी बाहेर पडलो घरातुन
इतके दिवस स्वतःला कोंडुन घेतले होते मी
का ते माहीत नाही?
पण आज थोडं बरं वाटलं !!
भटकतं भटकतं पोहोचलो एका दुस-याच गावात
इथल्या गर्दीत हरवुन जो तो केवळ धावत होता
कोणालाच कोणाची पर्वा नव्हती
कशाला करेल पर्वा
प्रेम... माया... नाती-गोती
ह्या सगळ्याला इथे किंमतच नव्हती
पैसाच सगळ्यांचा इथे नातलग होता
कोणीच कोणाला ओळखत नव्हते
असाच फिरता फिरता एके ठिकाणी
माझी पाऊलेच थबकली
पुढे जाऊच शकत नव्हतो
सहज म्हणुन डोकावलो त्या गर्दीत,
कोणीतरी रडत होते
आणी समोर एक शव होते
ते शव कोणाचे होते माहीत नाही
पण ती म्हातारी मात्र धाय मोकलुन रडत होती...
बिथरली होती….
मी गर्दीतुन पुढे सरसावलो
तिच्या थरथरत्या हातांवर हात ठेवत मी बोललो
चल म्हातारे मी करतो मदत तुला...
त्याचे शव मीच उचलून नदीच्या तिरावर नेले
तो माझा कोणीच लागत नव्हता
तरीही मी त्याचे अंत्यसंस्कार केले
म्हातारी पार कोसळली होती
तिच्या लेकराला मातीत मिसळताना
बघण्याची वेळ आज तिच्यावर आली होती

नेहमीच तुमचाच
ओंकार