वाटही खुळी..
धुक्यात हरवलेली..
दवात न्हालेली..पहाटेच्या...
आकाश भेदुन...
एक दिर्घ किंकाळी...
आलेली....ती...
चुकार हळव्या मनाची....
मंतरलेल...जग..
त्या खुळ्या कल्पनांच...
सारेच तुझं...
सारंच तुझं....
मी तेंव्हा होतो..
आजही आहे...
अन उद्या कदाचीत असेनही...
तुझ्यासाठीच....
त्या धुळीत माझी विराणी..
हरवुन......
केवळ..
.त्या उगवणा-या सुर्याची वाट बघत...
ओंकार
Wednesday, February 9, 2011
गो चेडवा.
त्याच
गावच्या येशीवर....
आसा मा रे
ता वडाचा झाड..
त्याका
कधीतरी इचारुन बघ..
तोपन सांगीत तुका....
तुझ्या माझ्या गोष्ठी...
त्याना
ऐकलेल्या लपान
त्याच वाटेन जाताना.
माझो हात..
तिया...धरलसं....
तुका नाय कळाचा...
गो चेडवा..तिया...
कालच ...
काळजावर
तुझा नाव कोरलसं
Omi
गावच्या येशीवर....
आसा मा रे
ता वडाचा झाड..
त्याका
कधीतरी इचारुन बघ..
तोपन सांगीत तुका....
तुझ्या माझ्या गोष्ठी...
त्याना
ऐकलेल्या लपान
त्याच वाटेन जाताना.
माझो हात..
तिया...धरलसं....
तुका नाय कळाचा...
गो चेडवा..तिया...
कालच ...
काळजावर
तुझा नाव कोरलसं
Omi
माणुस
भळभळती जखम
माझी पाहुन देखील..
विचारायला कोणालाच
का वेळ नाही?...
जाऊदेना....माणुस मी...
माझा कसलाच नेम नाही...
व्रण दिसतोय डोळ्यांनी पण
तोही कदाचीत तितका खोल नाही...
त्या अबोल...दुःखाची
का कोणालाच सल नाही...
जाऊदेना....माणुस मी...
माझा कसलाच नेम नाही...
मोल जाणतो मी...पैश्याचे...
प्राणांचे देण घेणं नाही...
रोज लढाई नवी श्वासांची...
जगण्या मरण्याची तमा नाही....
जाऊदेना....माणुस मी...
माझा कसलाच नेम नाही...
ओंकार
माझी पाहुन देखील..
विचारायला कोणालाच
का वेळ नाही?...
जाऊदेना....माणुस मी...
माझा कसलाच नेम नाही...
व्रण दिसतोय डोळ्यांनी पण
तोही कदाचीत तितका खोल नाही...
त्या अबोल...दुःखाची
का कोणालाच सल नाही...
जाऊदेना....माणुस मी...
माझा कसलाच नेम नाही...
मोल जाणतो मी...पैश्याचे...
प्राणांचे देण घेणं नाही...
रोज लढाई नवी श्वासांची...
जगण्या मरण्याची तमा नाही....
जाऊदेना....माणुस मी...
माझा कसलाच नेम नाही...
ओंकार
Sunday, February 6, 2011
पाऊले...
रोजचाच थेंब..
दिसे आज तो नभांत.
दिसेनाशी पाऊले...
भर पावसांत.
अंगणी का साचला...
माझ्या प्राजक्ताचा सडा..
वर चंद्रमा का लपे
उगा चांदण्यात
दिसेनाशी पाऊले
भर पावसांत.
थेंब थेंबातुन साचे...
प्रेम माझ्या त्या तळ्यात...
पायवाट भिजवी...सये
पाऊले ती तुझी दवांत
दिसेनाशी पाऊले
भर पावसांत.
नाद पैजणांचा उठवी
काहुर का मनांत..
आहेस स्वप्नी...मग
कधी येशील सत्यात...
दिसुदेत सये...तुझी पाऊले
भर पावसांत.
ओंकार
दिसे आज तो नभांत.
दिसेनाशी पाऊले...
भर पावसांत.
अंगणी का साचला...
माझ्या प्राजक्ताचा सडा..
वर चंद्रमा का लपे
उगा चांदण्यात
दिसेनाशी पाऊले
भर पावसांत.
थेंब थेंबातुन साचे...
प्रेम माझ्या त्या तळ्यात...
पायवाट भिजवी...सये
पाऊले ती तुझी दवांत
दिसेनाशी पाऊले
भर पावसांत.
नाद पैजणांचा उठवी
काहुर का मनांत..
आहेस स्वप्नी...मग
कधी येशील सत्यात...
दिसुदेत सये...तुझी पाऊले
भर पावसांत.
ओंकार
स्वप्ने
श्वासही खुळे...अन पाऊलेही..
दोघेही कुठे नेतील आयुष्याला..काहीच नेम नाही..
अन मी मात्र असाच निरतंर चालत..
नशीबाला दोष देत..
नशीब कधी का आपली साथ देत ??
साथ देतात ती आपली स्वप्नं आणि
मेहनत आपल्या स्वप्नापुर्तीसाठीची
पुन्हा उभं राहाण्यासाठी...
उभे राहाण्याची ती माझी केवीलवाणी धडपड
अन...ते तसेच दुणावते श्वास..
सत्यातही मनास मोहवणारा..
तोच तुझा सप्तरंगी आभास....
तुझं अस्तित्व...ते असचं..खुणावणारं..
अन माझं फसणं देखील तसचं..
सारं काही माहीत असुनही माझं पुन्हा तेचं करणं.
अन वाट चुकली माझी म्हणुन तुझं ते निरागस हसणं
खुळाच मी..अन खुळीच पाऊले...
एकत्र पाहीलेली स्वप्नही खुळीच..
बाकी उरलेलं...ते
तुझ्यातला मी.अन माझ्यातली तु...
मागे न वळण्याची शपथ घेऊन
तू यशस्वी होतांना
मला पहायचं आहे
तू फक्त चालत राहा
मागे तुला वळून न देण्याची खात्री मी देते
बस...तुझी आश्वासक साथ
पुरेशी आहे..आज जगाविरुध्द लढायला..
हक्काचं एक माझं आभाळ..
मनाजोग्या रंगांनी रंगवायला
हक्काचं ते तूझं आभाळ माझंही असू देत
कडु गोड आठवणीत तुझ्या मी हि असू देत
मैत्रीचा हात हवा असल्यास आठव मला
तुझ्याकडे काही दु:ख असतील तर पाठव मला.........
माझे अश्रुही आजकाल..तुझ्या डोळ्यांतुन ओघळतात..
अन...डोळे भर दिवसाही आजकाल तुला शोधतात
अन हरवून तुझ्या त्या स्वप्नील डोळ्यात
स्वप्न उद्याची मीही पाहाते
ओंकार व वर्षा..
दोघेही कुठे नेतील आयुष्याला..काहीच नेम नाही..
अन मी मात्र असाच निरतंर चालत..
नशीबाला दोष देत..
नशीब कधी का आपली साथ देत ??
साथ देतात ती आपली स्वप्नं आणि
मेहनत आपल्या स्वप्नापुर्तीसाठीची
पुन्हा उभं राहाण्यासाठी...
उभे राहाण्याची ती माझी केवीलवाणी धडपड
अन...ते तसेच दुणावते श्वास..
सत्यातही मनास मोहवणारा..
तोच तुझा सप्तरंगी आभास....
तुझं अस्तित्व...ते असचं..खुणावणारं..
अन माझं फसणं देखील तसचं..
सारं काही माहीत असुनही माझं पुन्हा तेचं करणं.
अन वाट चुकली माझी म्हणुन तुझं ते निरागस हसणं
खुळाच मी..अन खुळीच पाऊले...
एकत्र पाहीलेली स्वप्नही खुळीच..
बाकी उरलेलं...ते
तुझ्यातला मी.अन माझ्यातली तु...
मागे न वळण्याची शपथ घेऊन
तू यशस्वी होतांना
मला पहायचं आहे
तू फक्त चालत राहा
मागे तुला वळून न देण्याची खात्री मी देते
बस...तुझी आश्वासक साथ
पुरेशी आहे..आज जगाविरुध्द लढायला..
हक्काचं एक माझं आभाळ..
मनाजोग्या रंगांनी रंगवायला
हक्काचं ते तूझं आभाळ माझंही असू देत
कडु गोड आठवणीत तुझ्या मी हि असू देत
मैत्रीचा हात हवा असल्यास आठव मला
तुझ्याकडे काही दु:ख असतील तर पाठव मला.........
माझे अश्रुही आजकाल..तुझ्या डोळ्यांतुन ओघळतात..
अन...डोळे भर दिवसाही आजकाल तुला शोधतात
अन हरवून तुझ्या त्या स्वप्नील डोळ्यात
स्वप्न उद्याची मीही पाहाते
ओंकार व वर्षा..
Subscribe to:
Posts (Atom)




