Monday, September 19, 2011

"अर्थ"



चुकलो मी बोलणारे.
स्वतःच चुकले होते..
आरोप करणारे ते..
शब्दच थकले होते

निस्तेज भावनांचा..
फक्त आज पसारा
थोडासा बोचणारा..
सखे तो पहाटवारा

जगेन मी अवश्य...
सोबत तुझीच याद..
परतेनही मी नव्याने
जर देशील सये साद

थोडीशी चुकलेली तु..
थोडासा चुकलेला मी..
थोडीशी बावरलेली तु.
थोडासाच सावरलेला मी..

कधी नव्हे ते त्या दोन
समांतर रेषांना किनारा मिळाला
जाऊदे ना..हरवलेला अर्थ
दोघांचाही त्याक्षणी दोघांना मिळाला

ओंकार

Saturday, September 17, 2011

न उमललेलं फुल


अजुन कवडसाही पाहीला नव्हता
मी ह्या नश्वर अश्या संसाराचा..
त्याच क्षणी घोटला गेला गळा
त्या एका उमललेल्या फुलाचा..

नक्की चुक कोणाची? कोण सांगेल..
माझी...त्याची...का त्या फुलाची..
खुडण्याचे पातक आयुष्यभर कवटाळुन
आजन्मच जगत राहायचे? अन का?

एका क्षणांत चेह-यावरचे हासु...
अश्रुंत निमुटपणे भिजुन गेले...
अन आजन्म आता बस..तुझ्या
आठवांत जगणे नशीबी आले.

ओंकार


अनाम बंध




काल रात्रीचा तुझा भास..
खरचं खुप खास होता..
माझ्यासोबत तु असल्याचा
तो हुरहुरता आभास होता..


तुला कायमच पाहीलेय मी..
चांदण्या पदरावर लेवताना..
त्या अखंड अव्याहत पावसांत
अगदी चिंब होऊन भिजताना..


नकळतच तुझ्या ओढणारी..
सखे प्रित तुझी नी माझी..
सांग न जुळेल का सखे 
कधी कहाणी तुझी माझी


समोर येशील जेंव्हा माझ्या..
सांग ना? मी तुला ओळखु शकेन?
की तुझ्या असण्यानसण्याच्या प्रश्नांत
मी  तेंव्हा पुन्ह नव्याने गुंतेन?


येशील ना... सखे भेटायला..
तेंव्हा बस ..एवढेच कर..
तुझ्या माझ्यातल्या ह्या
अनाम बंधास थोड घट्ट कर..


ओंकार

"भ्रांत"

स्वप्नांतल्या कळ्यांना..
रात्रीस जाग आली..
त्या वेड्या पाऊलांना.
का तुझीच याद आली?

वाट शोधतो मी पुन्हा..
ती सहज तुझी नी माझी..
उमगेल का कधीही
वेडे तुला कहाणी ग माझी

तु भेटशील तेंव्हा..
मन होईल माझे शांत
न भेटशी तोवरी ही.
अनामिक गुढ भ्रांत

ओंकार

Friday, September 9, 2011

आता तरी येशील का?

उजाडला तो नवा दिवस..
अन डोळ्यांत दाटलेलं नवस्वप्न
नवीच उमेद..वादळासही झेलण्याची..
अन नवीच साद...जन्मोजन्मांतरीची..
त्या सादेस प्रतिसाद बनुन...
कधी तरी ऐकु येशील का?
सांग ना आता तरी येशील का?

वाट तुझी बघता बघता...
दिवस हाही सरुन गेला..
सांजवेळी..शब्द खुळा..
मनात ज्वार घेऊन आला..
शब्दांच्या कविता बनवण्यासाठी..
भावना बनुन येशील का?
सांग ना आता तरी येशील का?

रात ही विझली आता तरी येशील का?
ओंजळीतील चांदण्या..
आकाशांत गोवशील का?
त्या चांदव्यास देण्या साथ..
नभांत चांदण्यांपरी दिसशील का?
सांग ना आता तरी येशील का?

ओंकार...