Friday, December 30, 2011

कर्ज..तुझ्यावर

नुसता गुंता
खोल मनांत आठवांचा..
अन शिल्लक तो चुराडा
फक्त त्या चंदेरी स्वप्नांचा..
उगाच कश्यासाठी??
त्या सा-याला मखमलीत लपेटायचं..
पुन्हा त्या वचनांच ओझं..
का मनावर बाळगायचं ?..
नको...यार जपुन ठेवलेले काटे..
आता थेट काळजालाच बोचु लागलेत..
अन त्या वचनांचे ओझे सावरायला.
आता हातही टाळु लागलेत...
तसाही उपयोग काय.?
त्या सा-याचा..?
डोळ्यांतले अश्रुही आता
खुप खोलवरच सुकलेत..
अन तुटलेले बुरुज मनाचे..
मी नव्याने मागेच उभारलेत..
आता दिसतील कदाचित.
कुठेतरी त्या भग्नावशेषांच्या खुणा..
जमीनदोस्त होण्याची वाट बघत...
पुन्हा मातीत मिसळण्याच्या ओढीने..
खुप केलेस माझ्यावर
तुझ्या म्हणण्यानुसार उपकार..
आता पुरेसे कर..
तुझे हे असले भावनिक वार..
थांबव..आता हे तुझे असले..
फुकटचे अत्याचार..
तुही नकोयस..कुठेही आयुष्यात..
पण एक प्रश्न नक्कीच विचारायचाय..
कश्यासाठी चालवलायस खटाटोप..
मी असताना सोबत तुला...
माझी किंमत नव्हती..
काहीच मोल नव्हते तुला..
माझे...माझ्या प्रेमाचे..
मग आता?...
बदल माझ्यात
अजीबात झालेला नाही..
किंबहुना मी
कधीच बदलणार नाही..
कोणासाठीच मी
माझी ओळख अशी मिटवणार नाही...
आता तुला
माझ्याकडुन कुठेच थार नाही..
तु गेलीस सोडुन..अर्ध्यावरच..
तो डाव भातुकलीचा...
ती भातुकली कधीच सोडली
खेळायची...
आता दररोज साजरे करतो..
दिवस..जगण्याचे ..लढण्याचे...
तोच माझा दसरा..
अन तिच दिवाळी..
तुझ्यापासुन दुर जाऊन
पहील्यांदा स्वतःस शोधल..
सापडलो मी जश्याचा तसा..
त्या भुतकाळाच्या गर्तेत..
लपलेला...भांभावलेला..
रडलेला..कोसळलेला..
सावरलं मग स्वतःला...
मित्रांच्या सोबतीने..
अन त्या भगवंताच्या अशिर्वादाने...
सगळं काही नव्याने उभारलयं...
सगळं काही...
नवा डाव..नवचं राज्य...
नवा भिडु...अन नवा मी...
तुला वाटत असेल...
की कदाचित तुला आज माफ करेन.
पण ते निव्वळ अशक्य आहे...
कारण तुझ्यावर तुझ्या दग्याचे..
कधीच न उतरणारे..कर्ज आहे...
शक्य असेल तर शोध उत्तरे..
तुझ्या मनातल्या प्रश्नांची..
शोध..कुठे चुकलीस तु...
अन कुठे...बरोबर होतो मी.

ओंकार....

Thursday, December 29, 2011

सांज



लवकर येईन रे
नेहमीच बोलतेस..
तरीही येतेस
उशीराने..सांज ढळताच...
सारं गाव,
अंधाराच्या कुशीत निजताच..
लवकर जायचेय रे..
धपापत्या उराने बोलत..
ठाऊक आहे
तुलाही ओढ असते..
भेटण्याची..बोलण्याची...
हसण्याची...चिडण्याची.
मग....
लवकर परतुन जायची..
घाई कश्यापायी?
सांगतेस..माझ्या आठवांत...
दिवसभर झुरत असतेस..
अंगणातल्या प्राजक्ताशी
उगाचच भांडत असतेस...
गावातली प्रत्येक वाट..आज
तुझी माझी कहाणी सांगते..
तुझ्या माझ्या भेटीला
कारण....
तिच एक साक्षी असते..
तो पश्चीम क्षितीजावर हलकेच
सांडलेला चंद्रमा..
अन ती,
दुरवर रानात कुठेतरी.
हळुहळु बहरलेली रातराणी...
जणु.... त्या चंद्राच्या स्वागतासाठी..
तीही आसुसलेली...
तुझ्यच सारखीच...
अन तो दिव्यांच्या,
प्रकाशात न्हालेला गाव..
पौर्णीमेच्या टिपुर चांदण्यात
उजळलेलं आभाळ
सारं कसं गुढ...
तुझ्या गही-या डोळ्यांसारखं.
स्वप्न डोळ्यांत असुनही...
अबोल...
निरागस...तुझ्या माझ्या,
मिलनाची प्रार्थना करत.
हसत..दुनीयेसाठी...
पुन्हा.........
सांज ढळण्याची वाट बघत...

ओंकार

Tuesday, December 27, 2011

उगाच...अगदी सहजच

स्पर्श ओझरता तो
शेवटच्या भेटीचा..
हवा हवासा वाटलेला..
तुझ्या डोळ्यांत दाटुन
तो काळही क्षणभर
त्या वळणापाशी थांबलेला.
ठरवलं होतं न?
आपण पहीलचं
की परतुन मागे नाही पाहायचं
सा-या निरोपाचं देणं घेणं
फक्त
एकाच क्षणांत उरकायचं.
पाऊलेही चालु लागलीच..
डोळे मात्र
अजुनही तिथेच..
त्याच वळणापाशी...रेंगाळत
तुझ्या पाऊलांचे ठसे शोधत..
कश्यापायी...
देवासच ठाऊक..
फलाटावरुन सुटलेली गाडी..
अन वाढलेलं अंतर.
ति दुर दुर जाणारी तुझी
पाठमोरी सावली..अन.
भरुन आलेला उर..
पुन्हा तुझ्याच आठवणींनी..
तोही उगाच...अगदी सहजच

ओंकार


Monday, December 26, 2011

स्वतःसाठी...

एक मोरपिस...
एकच चाफ्याचं फुल..
एक तोच गुलाब...
अन तुझ्या ओठांचा ठसा..
अजुनही तसाच..
माझ्या कवितांच्या वहीवर.
प्रत्येक पानांत..
तुझी नवीन आठवण..
चुकार हळव्या क्षणांची..
एक
अबोल बोलकी साठवण..
थरथरते श्वास..अन
बाकी बरचं काही...
अनुत्तरीत..
तुझ्याच सारखं
तुझा तो,
नेहमीचा अट्टहास..

स्वप्नांना नव्याने घडवण्याचा..
अन माझा तो प्रयास..
झालेलं...
सारं काही विसरण्याचा..
आणखी काहीच नकोय ग..
बस...तु जग...अन..
मलाही जगुदे..
काही क्षणांपुरते..
स्वतःसाठी...

ओंकार

जगण्याच्या कला..




आडवाटेच्या माळरानावरचा केवडाही..
बघ ना...ह्या उन्हानं केवढा वाळलाय..
अन त्या पिवळ्या झालेल्या गवतालाही..
पुन्हा वणव्याचा ध्यास लागलाय

राख होऊन जन्म नवा घेईलही तो
उद्या कदाचित पावसांत उमलेलही तो..
पाऊलांना ओल्या तुझ्या चुंबेल तो..
पुन्हा तुझ्या पदस्पर्शाने मोहरेल तो

तो दुरदेशीचा पारवा आलाय पुन्हा परतुन..
ओल्या नदीस ओढ ओल्याच त्या रानातुन..
गुंजतेय साद..खुळी तीच तुला गहीवरुन..
भेट सखे धावत येऊन त्या माळरानावरुन.

कोसळेल तो घननिळा पाहाताच आज तुला..
बिलगशील गर्जताच नभ सखे तु अशीच मला?
तिच खुळी तु...अन तोच थोडा मी खुळा..
आहेत ह्याच मुळी माझ्या जगण्याच्या कला..

ओंकार