Friday, December 30, 2011

कर्ज..तुझ्यावर

नुसता गुंता
खोल मनांत आठवांचा..
अन शिल्लक तो चुराडा
फक्त त्या चंदेरी स्वप्नांचा..
उगाच कश्यासाठी??
त्या सा-याला मखमलीत लपेटायचं..
पुन्हा त्या वचनांच ओझं..
का मनावर बाळगायचं ?..
नको...यार जपुन ठेवलेले काटे..
आता थेट काळजालाच बोचु लागलेत..
अन त्या वचनांचे ओझे सावरायला.
आता हातही टाळु लागलेत...
तसाही उपयोग काय.?
त्या सा-याचा..?
डोळ्यांतले अश्रुही आता
खुप खोलवरच सुकलेत..
अन तुटलेले बुरुज मनाचे..
मी नव्याने मागेच उभारलेत..
आता दिसतील कदाचित.
कुठेतरी त्या भग्नावशेषांच्या खुणा..
जमीनदोस्त होण्याची वाट बघत...
पुन्हा मातीत मिसळण्याच्या ओढीने..
खुप केलेस माझ्यावर
तुझ्या म्हणण्यानुसार उपकार..
आता पुरेसे कर..
तुझे हे असले भावनिक वार..
थांबव..आता हे तुझे असले..
फुकटचे अत्याचार..
तुही नकोयस..कुठेही आयुष्यात..
पण एक प्रश्न नक्कीच विचारायचाय..
कश्यासाठी चालवलायस खटाटोप..
मी असताना सोबत तुला...
माझी किंमत नव्हती..
काहीच मोल नव्हते तुला..
माझे...माझ्या प्रेमाचे..
मग आता?...
बदल माझ्यात
अजीबात झालेला नाही..
किंबहुना मी
कधीच बदलणार नाही..
कोणासाठीच मी
माझी ओळख अशी मिटवणार नाही...
आता तुला
माझ्याकडुन कुठेच थार नाही..
तु गेलीस सोडुन..अर्ध्यावरच..
तो डाव भातुकलीचा...
ती भातुकली कधीच सोडली
खेळायची...
आता दररोज साजरे करतो..
दिवस..जगण्याचे ..लढण्याचे...
तोच माझा दसरा..
अन तिच दिवाळी..
तुझ्यापासुन दुर जाऊन
पहील्यांदा स्वतःस शोधल..
सापडलो मी जश्याचा तसा..
त्या भुतकाळाच्या गर्तेत..
लपलेला...भांभावलेला..
रडलेला..कोसळलेला..
सावरलं मग स्वतःला...
मित्रांच्या सोबतीने..
अन त्या भगवंताच्या अशिर्वादाने...
सगळं काही नव्याने उभारलयं...
सगळं काही...
नवा डाव..नवचं राज्य...
नवा भिडु...अन नवा मी...
तुला वाटत असेल...
की कदाचित तुला आज माफ करेन.
पण ते निव्वळ अशक्य आहे...
कारण तुझ्यावर तुझ्या दग्याचे..
कधीच न उतरणारे..कर्ज आहे...
शक्य असेल तर शोध उत्तरे..
तुझ्या मनातल्या प्रश्नांची..
शोध..कुठे चुकलीस तु...
अन कुठे...बरोबर होतो मी.

ओंकार....

2 comments: