Thursday, December 29, 2011

सांज



लवकर येईन रे
नेहमीच बोलतेस..
तरीही येतेस
उशीराने..सांज ढळताच...
सारं गाव,
अंधाराच्या कुशीत निजताच..
लवकर जायचेय रे..
धपापत्या उराने बोलत..
ठाऊक आहे
तुलाही ओढ असते..
भेटण्याची..बोलण्याची...
हसण्याची...चिडण्याची.
मग....
लवकर परतुन जायची..
घाई कश्यापायी?
सांगतेस..माझ्या आठवांत...
दिवसभर झुरत असतेस..
अंगणातल्या प्राजक्ताशी
उगाचच भांडत असतेस...
गावातली प्रत्येक वाट..आज
तुझी माझी कहाणी सांगते..
तुझ्या माझ्या भेटीला
कारण....
तिच एक साक्षी असते..
तो पश्चीम क्षितीजावर हलकेच
सांडलेला चंद्रमा..
अन ती,
दुरवर रानात कुठेतरी.
हळुहळु बहरलेली रातराणी...
जणु.... त्या चंद्राच्या स्वागतासाठी..
तीही आसुसलेली...
तुझ्यच सारखीच...
अन तो दिव्यांच्या,
प्रकाशात न्हालेला गाव..
पौर्णीमेच्या टिपुर चांदण्यात
उजळलेलं आभाळ
सारं कसं गुढ...
तुझ्या गही-या डोळ्यांसारखं.
स्वप्न डोळ्यांत असुनही...
अबोल...
निरागस...तुझ्या माझ्या,
मिलनाची प्रार्थना करत.
हसत..दुनीयेसाठी...
पुन्हा.........
सांज ढळण्याची वाट बघत...

ओंकार

1 comment: