Saturday, December 24, 2011

अर्धीच तु..


अर्धीच रात सरलेली..
अर्धीच बात उरलेली..
अर्धीच तु..राहीलेली..
अर्धी..खोल मनात साचलेली..

बात तुझी नी माझी..
ओठांआडच का अडलेली..
प्रत्येक शब्दांत अनोळखी..
नवीन कहाणी घडलेली

येशील सखे तु नव्याने..
याही जन्मी तु साजणे..
सजेल चांदण्यापरी आज
अलवार प्रितीचे नव तराणे

रमतो...मी आजही..खुळा
सखे तुझ्याच त्या डोळ्यांत..
शोधतो अजुनही ते गुढ..
ओठांआडचे प्रेम शब्दांत..

सखे येशील तेंव्हाच ये...
घेऊनी उत्तरे अनेक प्रश्नांची..
जाऊदे सरुन क्षणार्धात..
दरी ह्या एकट्या क्षणांची..

अदा तुझ्या नशील्या...
शब्द तुझा डोलणारा..
अत्तराच्या लक्षावधी कुप्या
क्षणांत श्वास तुझा खोलणारा

जाईन विसरुन सर्वस्व..
भेट तुझी होईल तेंव्हा..
नसेन असुनही कदाचित..
शिरशील मिठीत सखे जेंव्हा..

अर्धीच तु.. अर्धाच मी..
माझ्यात तु...तुझ्यात मी..
शब्दांत तु...डोळ्यांत मी..
प्रेम तु...अन
तुझ्यावरच्या कवितांत रमणारा..
फक्त माझाच मी..माझाच मी...

ओंकार

No comments:

Post a Comment